Take a fresh look at your lifestyle.

‘टेक्स्टाईल मार्केट’चा बोऱ्या; कोरोनामुळे पाहा किती कापड उत्पादन कमी झालेय..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक राज्यात सध्या लॉकडाऊन (lockdaun) करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. त्याचा सर्वाधिक फटका कापड व्यवसायाला बसला आहे.

Advertisement

गेल्या वर्षीही देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे बराच काळ उद्योग-धंदे बंदच राहिले. कोरोनातून सावरत दोन महिन्यांपूर्वी सुरतचा कापड व्यवसाय तेजीने आगेकूच करत निघाला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले.

Advertisement

छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि बिहारसह देशातील ९० टक्के भागांत सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे 15 मार्चला सुरतहून 400 ट्रक माल जात हाेता, तो आता शून्यावर आला आहे. त्यामुळे सुरतचे रोज 150 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

Advertisement

देशातील 70 % सिंथेटिक कापड तयार करणाऱ्या सुरतच्या ‘व्हिव्हिंग-निटिंग’ उद्योगात 7 लाख, ‘प्रोसेस हाऊस’ (Process House)मध्ये ३ लाख, ‘एम्ब्रॉयडरी’ (Embroidery)मध्ये अडीच लाख आणि कापड बाजारपेठेत अडीच लाख मजूर काम करतात. यापैकी निम्मे मजूर सात एप्रिलनंतर गावी ओडिशा, यूपी-बिहार, बंगालला परतले आहेत. आधी 3 कोटी मीटर कापडाचे रोज उत्पादन होत होते, आता ते 1.5 कोटी मीटर होत आहे.

Advertisement

बाजारपेठ उघडल्यावर त्वरित मागणी आल्यास विकण्यासाठी कपडे असायला हवेत. जे मजूर गेलेले नाहीत, त्यांच्या हाताला काम आणि दाम न मिळाल्यास तेही गावी परत जातील. शिवाय मशीन बंद राहिल्यास त्यात अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या काही प्रमाणात कापड उत्पादन सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply