Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुख्यमंत्र्यांपुढे फडणवीसांसह ‘महाविकास’चे मंत्रीही हतबल; पहा कोणत्या मुद्द्यावर ठाकरेंनी धरलेय ताणून

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षाची गोळाबेरीज आहे. यामध्ये अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बैठका घेऊन काही निर्णय जाहीर केलेही आहेत. मात्र, एका मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदारांसह अनेकांनी मागणी करूनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेणे टाळले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सगळेच ठाकरेंपुढे हतबल झालेले आहेत.

Advertisement

तो मुद्दा आहे चक्क पत्रकारांचा. होय, बातम्या देऊन वास्तव मांडण्याची जबाबदारी असल्याचा हा व्यवसाय. मात्र, कालानुरूप जाहिरातीच्या मार्केटमध्ये पत्रकारिता कमी होऊन जनसंपर्क बातम्या आणि लेखांचा पाउस पाडणाऱ्या पत्रकारांची ‘ताकद’ खालावली आहे. आताही राज्यभरात आरोग्याचा बोजवारा उडालेला असताना आणि केंद्र सरकारकडून ठोस मदत महाराष्ट्राला मिळत नसल्याच्या काळातही मुख्य धारेतील पत्रकार ‘त्या’ तीव्रतेने बातम्या देताना दिसत नाहीत. त्यातच अनेक पत्रकार संघटना आणि सर्वच राजकीय पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी आणि विविध सामाजिक संघटकांनी मागणी करूनही पत्रकारांना ‘फ्रंटलाईन’ म्हणण्यास ठाकरे सरकार तयार नाही. एकूणच पत्रकारितेची पॉवर आणि त्यांच्या कार्यावरच ठाकरे यांनी यानिमित्ताने थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

Chhagan Bhujbal on Twitter: “राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे.आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी,आरोग्य https://t.co/qHnUlX5D8j” / Twitter

Advertisement

इतर अनेक राज्य सरकारांनी एक-दोन पत्रांची दखल घेऊन पत्रकारांना फिल्डवर काम करण्यामध्ये असलेला आरोग्याचा धोका लक्षात घेऊन फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा दिला आहे. मात्र, ठाकरे सरकारने यावर कोणतीही कार्यवाही न करून पत्रकारांना एक वेगळा संदेश दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. पत्रकार हा घटक फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याजोगा नसल्याचा हा दुर्दैवी संदेश आहे. तरीही पत्रकार आणि पत्रकार संघटना यांच्यातून साधा निशेष म्हणून काळ्या फीत लावून काम करण्याचाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता ठाकरे सरकार या मुद्द्यावर कधी आणि कोणती भूमिका जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पात्र पाठवून म्हटले आहे की, राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा व त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे. बातम्यांच्या वृत्तांकनासाठी कार्यरत पत्रकार प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची
कोविड-१९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचे काम करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी.

Advertisement

तर, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, शातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल.

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

*(ता. क. : सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये काही चुका नजरचुकीने राहिल्या होत्या. त्याबद्दल क्षमस्व. कोणाचाही अपमान करण्याची आमची इच्छा नाही. फ़क़्त वास्तव दाखवणे हाच उद्देश आहे.)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply