Take a fresh look at your lifestyle.

भाजपने केले ‘महाविकास’ला लक्ष्य; पहा नेमके कोणत्या मुद्द्यावर घेरलेय ‘महाराष्ट्र मॉडेल’ला

मुंबई : सध्या करोना संकट असताना महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या वाढीसह त्या सर्वांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे सर्व बाबींचे रेशनिंग, त्यामध्ये महाराष्ट्राला लोकसंख्या-रुग्णसंख्या यांच्या प्रमाणात मदत न मिळणे, यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे त्रुटीयुक्त नियोजनही जबाबदार आहे. त्याची जबाबदारी ना भाजपने घेतली आहे ना महाविकास आघाडी सरकारने.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल. https://t.co/Uyk5fgtGaP” / Twitter

Advertisement

मात्र, या दोन्ही बाजूंचे राजकारण जोमात आहे. कारण, राजकीय युद्धात कोणाचीही जबाबदारी सिद्ध न होता जनतेचे मनोरंजन होऊन सर्वांना मुलभूत विषयांचा विसर पडत असतो. त्याचाच एक भाग म्हणून ‘महाराष्ट्र मॉडेल’ विरुद्ध ‘मोदी मॉडेल’चे भांडण जोमात आहे. याच ‘महाराष्ट्र मॉडेल’वर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र मॉडेल… सत्ताधारी महा विकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल सामान्य जनतेच्या जीवीताची सुरक्षा कोणी करायची? अर्थात राज्य सरकार खंडणी वसुलीत गर्क असेल तर कायदा सुव्यवस्थेबाबत यापेक्षा वेगळी अपेक्षा आपण काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे.

Advertisement

तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मिडिया खाते चालवण्यासाठी राज्य सरकारने 6 कोटी रुपये बाजूल ठेवल्याच्या मुद्द्यावरही भाजपने टीका केली आहे. भातखळकर यांनी यावर म्हटले आहे की, लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल. पैसे जनतेचे जीव वाचवण्यासाठी खर्च करायचे नाहीत, फक्त प्रसिद्धीवर करायचे हे धोरण असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबवण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply