Take a fresh look at your lifestyle.

म्हणून देशभरातील करोना मृत्युसंख्या झालीय कमी; पहा भाजपने नेमका काय केलाय दावा

दिल्ली : सध्या करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच औषधे, ऑक्सिजन आणि लसीकरण या मुद्द्यावर केंद्र आणि सर्वच राज्यातील सरकारे हतबल आहेत. दीड वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून ठोस उपाययोजना न केल्याचा जनतेमध्ये मोठा रोष आहे. त्याच मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एका मंत्र्यांनी चक्क थेट फाशी घेण्याचीच भाषा केली आहे. तर, भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारचे काम योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

Advertisement

गुरुवारी केंद्रीय रसायन व खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांना पत्रकारांनी प्रश्न केल्यावर त्यांनी संताप व्यक्त करून म्हटले की, सरकार आपले काम प्रामाणिकपणाने आणि सचोटीने करीत आहे आणि त्या काळात काही उणीवा समोर आल्या आहेत. गोष्टी सुधारतील आणि काही दिवसात लस देता येतील यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लस उत्पादन आणि वितरणामध्ये काही अडचणी आहेत म्हणून आता सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी स्वत:ला काय फासावर लटकावून घ्यावे काय?

Advertisement

सदानंद गौडा यांच्यासमवेत उपस्थित असलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी दावा केला आहे की, जर मोदी सरकारने वेळेत व्यवस्था केली नसती तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकली असती आणि मृत्यू दहापट किंवा 100 पट जास्तच झाले असते. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय प्रसारामुळे सरकारची तयारी कमी पडली. कोरोना विषाणूच्या विषयावर कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले या मुद्द्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर रवी म्हणाले की, न्यायाधीशांना सर्व गोष्टीच माहिती नसतात आमच्याकडे उपलब्ध संसाधनाच्या आधारे तांत्रिक सल्लागार समिती किती लस कुठे वितरित करायची याची शिफारस करते. त्यांच्या अहवालाच्या आधारेच आम्ही (सरकार) निर्णय घेईल.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply