Take a fresh look at your lifestyle.

आणि करोनाच्या मुद्द्यावर मोदींचे मंत्री भडकले; पहा का केलीय फाशी घेण्याचीच भाषा

दिल्ली : सध्या देशभरात करोनाचे संकट भीषण असतानाच औषधे, ऑक्सिजन आणि लस याबाबतही सरकार कमी पडत आहे. दीड वर्षात सरकारकडून ठोस उपाययोजना न केल्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोठा रोष आहे. त्याचा स्पष्ट ताण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळावर दिसत आहे. अशाच एका प्रश्नावर उत्तर नसल्याने मग मोदींचे एक मंत्री भडकले आणि त्यांनी चक्क थेट फाशी घेण्याचीच भाषा केली आहे.

Advertisement

देशभरात कोरोना लसीकरण युद्धपातळीवर सुरू असतानाच लसचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक राज्याला आपल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात लस लवकर हवी आहे. परंतु, सध्या त्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यावर गुरुवारी केंद्रीय रसायन व खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर त्यांनी संताप व्यक्त करून म्हटले की, लस उत्पादन आणि वितरणामध्ये काही अडचणी आहेत म्हणून आता सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी स्वत:ला काय फासावर लटकावून घ्यावे काय?

Advertisement

गौडा पत्रकारांना म्हणाले की, कोर्टाने चांगल्या हेतूने म्हटले आहे की देशात प्रत्येकाचे लसीकरण केले पाहिजे. मला तुम्हाला हे विचारायचे आहे की जर कोर्टाने उद्या असे म्हटले की तुम्हाला इतक्या लस द्यायच्या आहेत आणि जर त्या तयार करता येत नसतील तर आम्ही स्वत:ला फासावर लटकावून घेऊ का? आणखी पुढे ते म्हणाले की, याबाबतचे निर्णय कोणत्याही राजकीय फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी निर्देशित केलेले नाहीत. सरकार आपले काम प्रामाणिकपणाने आणि सचोटीने करीत आहे आणि त्या काळात काही उणीवा समोर आल्या आहेत. गोष्टी सुधारतील आणि काही दिवसात लस देता येतील यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

Advertisement

सदानंद गौडा यांच्यासमवेत उपस्थित असलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी दावा केला आहे की, जर मोदी सरकारने वेळेत व्यवस्था केली नसती तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकली असती आणि मृत्यू दहापट किंवा 100 पट जास्तच झाले असते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply