Take a fresh look at your lifestyle.

कारची वॉरंटी, फुकट सर्व्हिसिंगबाबत कंपन्यांनी घेतलाय ‘हा’ निर्णय..!

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानं दुकानांना टाळे लागलेले आहे. त्यात राज्य सरकारने आता १ जूनपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे या काळात वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंग कशी करायची, असा प्रश्न वाहनमालकांना पडला आहे. याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने निर्णय जाहीर केला आहे. काय आहे हा निर्णय, चला तर पाहू या..

Advertisement

लॉकडाऊनमुळे आता ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत महिंद्रा अँड महिंद्रा या ऑटोमोबाईल कंपनीने ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Advertisement

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने असे जाहीर केले आहे, की ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. ज्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे, त्याच्यासाठी आता 30 जून 2021 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स, तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यात Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या वाहनांचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, ‘टाटा मोटर्स’नेही (Tata Motors) वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढविली आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे.

Advertisement

‘मारुती सुझुकी’ (Maruti Suzuki)नेही वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी 30 जूनपर्यंत वाढवित असल्याचे जाहीर केले आहे. ‘मारुती सुझुकी इंडिया’चे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले, की ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जूनपर्यंत वाढविली आहे. दरम्यान, ‘मारुती’सह इतर अनेक कंपन्यांनीही हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply