Take a fresh look at your lifestyle.

आता ‘त्या’वरही अमेरिकेने व्यक्त केली चिंता; पहा काय म्हटलेय भारताच्या परिस्थितीबाबत

दिल्ली : भारत सरकारच्या धोरणामुळे कशा पद्धतीने करोना संक्रमणाचा धोका वाढला आणि बेधुंद निवडणूक प्रचार सभा आणि कुंभमेळा याचा कसा फटका बसला यावरही अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रशासनाने टिपण्णी केली आहे. आता त्याच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात धार्मिक स्वातंत्र्याच्या विषयाकडे पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याने अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी नियमितपणे चर्चा होत असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत सरकारकडे नागरी समाज गटांच्या चिंता सोडवण्याची संधी आहे असे म्हटले आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील 2020 च्या अहवालाविषयी पत्रकारांना माहिती देताना अधिकारी डॅनियल नॅडल म्हणाले की, भारत सरकारला तेथील काही समस्या सोडवण्याची खरी संधी आहे. नागरी समाजाशी संवाद, लोकशाही मूल्ये आणि भारताच्या सहिष्णुतेचा मोठा इतिहास, अल्पसंख्याकांच्या संरक्षणासह मानवाधिकार जबाबदाऱ्या आणि त्याच्या वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी आमचा विभाग भारतीय अधिकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहित करतो. याबाबत त्यांच्याशी नियमित संवाद सुरू असतो.

Advertisement

स्टेट डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल रिलिझम फ्रीडमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी नॅडेल यांनी अहवालाचे मुद्दे सांगताना म्हटले आहे की, सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा याबद्दल मुस्लिम समुदायामध्ये चिंता असल्याचे दिसते. मुस्लिमांनी देशात कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे युनायटेड स्टेट्स प्रशासन भारतीय सरकारला अशा धार्मिक समुदायांशी संवाद साधण्याचा सल्ला देते. त्याचबरोबर भारताने अशा कायद्यापासून दूर रहावे.

Advertisement

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा असे कायदे संमत करण्यास्तही पुढाकार घेतला जातो त्यावेळी या समुदायांशी प्रभावी सल्लामसलत केली जात नाही. मग काळानुसार त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण होते. अशा नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न हीच सरकारसाठी सर्वात चांगली बाब असते. तर, यावर राज्य सचिव अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे की, बिडेन-हॅरिस प्रशासन जगभरात धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण त्यासाठी महत्वाचे आहे.

Advertisement

यावेळी या अधिकाऱ्यांनी कबूल केले की, भारतासह अनेक देशात मुस्लिमविरोधी द्वेष अजूनही बर्‍याच देशांमध्ये आहे. अगदी अमेरिकेसाठीही ही एक गंभीर समस्या आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये सीएएविरोधात झालेल्या घटनांमध्ये नवी दिल्लीतील आंदोलनात हिंसक घटनाही घडल्या. या धार्मिकदृष्ट्या झालेल्या हल्ल्यांमध्ये 53 जणांचे मृत्यू झाले. त्यातील बहुतेक मुस्लिम धर्मीय आणि दोन सुरक्षा अधिकारीही होते. गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या इस्लामिक तबलीगी जमात संघटनेच्या संमेलनाबद्दलही यात उल्लेख आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमाणासाठी सरकार आणि माध्यमांनी सुरुवातीलाच त्यांना दोषी ठरवले होते, याचीही आठवण त्यात काढण्यात आलेली आहे. पुढे न्यायालयानेही माध्यमांनी याबाबत चुकीचे वृत्तांकन केल्याची टिपण्णी केली होती.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply