Take a fresh look at your lifestyle.

एक ट्विट नि ‘बिटकॉइन’ धडाम्.. पहा नेमकं काय झालं..?

नवी दिल्ली : भारतात बिटकॉईन (Bitcoin)ला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे त्यास फारसा उठाव नाही. त्यामुळे साहजिकच भारतीयांना बिटकॉइन वा क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency)बद्दल फारशी माहिती नाही. मात्र, अमेरिकेसह काही युरोपीय देशांमध्ये बिटकॉइनचा सर्रास वापर केला जातो. क्रिप्टोकरन्सी हे असे चलन आहे जे डिजिटल माध्यम म्हणून खासगीरित्या जारी केले जाते.

Advertisement

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, जागतिक बाजारात एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव तब्बल 17 टक्क्यांनी कोसळला. गेल्या वर्षभरापासून बिटकॉईनने भरारी घेतलेली असताना, एक ट्विट अडचणीचं ठरलं. हे ट्विट केले होते, टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेस एक्स (SpaceX) अशा दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांनी. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे भाव अक्षरश: गडगडले.

Advertisement

एलन मस्क आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की “टेस्ला कंपनीच्या कार ‘बिटकॉईन’द्वारे खरेदी करता येणार नाहीत. बिटकॉईन मायनिंग आणि त्यासंबंधी जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळं आपण चिंतेत आहोत. बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला नको.”

Advertisement

एलन मस्क यांच्या ट्विटपूर्वी बिटकॉईनच्या एका क्रिप्टोकरन्सीचा भाव 54 हजार 819 अमेरिकन डॉलर होता. भारतीय चलनात त्याची किंमत 40 लाख 36 हजार 48 रुपये होते. एलन मस्क यांच्या ट्विटनंतर हा भाव 45700 अमेरिकन डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात 33 लाख 64 हजार 662 रुपयांवर आला. म्हणजे तब्बल 1 मार्चनंतर पहिल्यांदा बिटकॉईनचा भाव या पातळीवर आला आहे. केवळ बिटकॉईन नव्हे, तर इतर 15 क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण झाली.

Advertisement

बिटकॉईनचा वापर करुन टेस्ला कंपनीची कार खरेदी करता येईल, अशी घोषणा एलन मस्क यांनीच 8 फेब्रुवारीला केली होती. त्यावेळी बिटकॉईनच्या भावात 14 टक्के वाढ झाली होती.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply