Take a fresh look at your lifestyle.

फसवणूक टाळण्यासाठी वाचा ‘ही’ माहिती; पहा खतविक्रीबाबत काय आहेत सरकारी सूचना

पुणे : यंदा खताच्या भाववाढीच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खत कंपन्यांनी दरवाढ केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादन खर्चात यामुळे वाढ होणार आहे. त्याचवेळी बाजारात मागील वर्षीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून तोच जास्त रेटने विक्री होण्याची शक्यता कृषी विभागाला वाटत आहे. त्यामुळे या विभागाने खतविक्रीबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दिलेल्या सूचना अशा :

Advertisement
  1. खत विक्रेत्यांनी जुन्या व नवीन खताचा साठा किती आहे. त्याच्या किमती काय आहेत, याचा फलक सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने लावावा.
  2. फलक दुकानाजवळ दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत, अशांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
  3. जुन्या खतांचा मोठा साठा शिल्लक आहे. ते खत जुन्याच दराने विक्री करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताच्या गोणीवरील किंमत पहावी.
  4. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर भरारी पथक नेमलेले आहेत.

उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत प्रति गोणी ६० ते ६५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. न्युट्रियंट बेस्ड पॉलिसीनुसार, युरिया वगळता उर्वरित रासायनिक खतांचे दर ठरवण्याचा अधिकार कंपन्यांना आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खत कंपन्यांनी दरवाढ केली आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी खते, बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. *(अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत (maharashtra.gov.in) यावर जाऊन माहिती घ्या.)

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply