Take a fresh look at your lifestyle.

ग्रीन टीचे आहेत ‘हे’ फायदे; पहा नेमका किती आणि कसा गुणकारी आहे हा चहा

आपल्याकडे चहा किंवा कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करण्याची आता पद्धतच पडली आहे. चहा घेणे जणू काही सवयीचाच भाग बनला आहे. त्यामुळे हर्बल टीने (ग्रीन टी) देखील दिवसाची सुरुवात केल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल. कारण आपले आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने हर्बल टी फायदेशीर आहे. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हर्बल टी आपल्या पचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यात देखील याची मदत होते.

Advertisement

ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीराचे वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ‘ग्रीन टी’ ही त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. त्यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो.

Advertisement

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाणी जास्त गरम करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यातील आवश्यक जीवनसत्वे नष्ट होतात. लेमन टी’ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ‘लेमन टी’ नियमित घेतल्यास फायदेशीर ठरू शकते. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला येणे असे त्रास उद्भवू शकतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply