Take a fresh look at your lifestyle.

उन्हाच्या कडाक्यात घमोळ्यांनी हैराण..; काळजी नकोय फ़क़्त अशी घ्या काळजी, मिळेल आराम

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना घामोळ्या, पुरळ येण्याच्या समस्या जाणवतात. शरीरात उष्णता वाढली की असा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या समस्यांना दूर करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात. यासाठी जास्त खर्च ही केला जातो. या खर्चिक उपायांनी फरक पडत असेलही मात्र, प्रत्येकालाच हे शक्य होईल असे नाही. त्यामुळे घामोळ्यांना पळवण्यासाठी काही अगदी सोपे घरगुती उपाय देखील आहेत. या उपायांनी देखील फरक पडू शकतो. काय आहेत हे उपाय जाणून घेऊ या…

Advertisement

जेव्हा घामोळ्यांची समस्या जास्त तीव्र असेल तर त्वरीत आराम मिळवण्यासाठी ही पद्धत वापरात आणायला हवी. सर्व प्रथन दोन किंवा तीन बर्फाचे तुकडे घ्या. हे बर्फाचे तुकडे साफ सुती रुमालात बांधून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. याने तुम्हाला त्वरीत आराम मिळेल. दिवसातून पाच ते दहा मिनीट या पद्धतीने मालिश केल्यास घामोळ्यांचा त्रास बऱ्याच अंशी कमी होईल.

Advertisement

दही देखील पुरळ, घामोळ्यांच्या समस्येवर गुणकारी आहे. अर्धा वाटी दही घ्या. यामध्ये पुदीनाची सहा ते सात पाने बारीक करुन टाका. आता या मिश्रणाच्या सहाय्याने हलक्या हाताने साधारण दहा मिनीटे मसाज करा. दिवसातून दोन वेळेस या पद्धतीने मसाज केल्यास फायदा होईल.

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाण्यास सांगितले जाते. तसेच घामोळ्यांच्या समस्यांवर सुद्धा काकडी फायदेशीर ठरू शकते. यासाठी सर्व प्रथम काकडी बारीक किसून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर टाका. हे मिश्रण साधारण दहा मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर मिश्रण घामोळ्यांवर लावा. याने सुद्धा फरक पडेल. या काही साध्या आणि सोप्या उपायांनी सुद्धा घामोळ्यांच्या समस्या कमी करता येऊ शकते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply