Take a fresh look at your lifestyle.

बातमी पावसाची : पहा चालू आठवड्यात कुठे बरसणार अवकाळी; तुमच्याही भागात आहे की शक्यता..!

पुणे : मॉन्सूनची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाळी ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाची धग आणि त्याचवेळी मॉन्सूनपूर्व पावसाच्या बातम्याही वेगाने येत आहेत. चालू आठवड्यातील उरलेल्या पाचही दिवसात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात कायम असतानाच उत्तर ते दक्षिण कमी दाबाचा पट्टा विदर्भ व लगतच्या भागापासून मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटक मार्गे उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अशी परिस्थिती कायम असतानाच अरबी समुद्रात येत्या तीन ते चार दिवसांत चक्रीवादळाची शक्यता असल्याने अवकाळी पावसाच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे.

Advertisement

या उलटसुलट वातावरणात १२ ते १६ मे या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आग्नेय अरबी समुद्रात १४ मेच्या सकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हे नंतर आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्विप बेटाजवळ सक्रिय होईल असे संशोधकांना वाटत आहे. दि. १६ मे रोजी या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ते उत्तर ते वायव्य अरबी समुद्रात ओमोनच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने मग हाराष्ट्राच्या किनारपट्टीला फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

दि. १२ व १३ मे या कालावधीत  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा पाउस होईल. तर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आदि जिल्ह्यात १४ मे रोजी पाउस होईल. तसेच बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत १५ व १६ मे या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply