Take a fresh look at your lifestyle.

आणि सोयाबीन बियाण्याच्या टंचाईवर केली मात; पहा मराठवाडा पॅटर्नची कमाल

औरंगाबाद : मागील वर्षी आलेल्या बियाणे टंचाई आणि उगवण क्षमतेचा घोळ यंदा टाळण्यासाठी कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यासाठी खास मराठवाडा पॅटर्न राबवला. औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ४० हजार १२ क्विंटल बियाणे उत्पादन घेण्यात या प्रयोगामुळे यश आलेले आहे. हे बियाणे आणि सीड कंपन्यांचे बियाणे मिळून यंदा मराठवाड्यात बियाणे टंचाईचे चित्र दिसणार नसल्याचा विश्वास कृषी विभागाला वाटत आहे.

Advertisement

मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यात मोठ्या सोयाबीन पेरणी क्षेत्राचा विचार करता या भागात सुमारे १६ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज पडते. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बियाणे उत्पादनावर परिणाम झाल्यानंतरही सुमारे ११ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचे कृषी विभागाचे गणित आहे. तर, आताच्या उन्हाळ्यात ४० हजार १२ क्विंटल बियाणे उत्पादित झाले आहे. उर्वरित ४.६० लाख क्विंटल बियाणे महाबीज, खासगी कंपन्या, भारतीय सीड्स निगमकडून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी उन्हाळा हंगामात ३ हजार ७८६ हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन प्रयोग यशस्वी केला. यातून ४० हजार १२ क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. मात्र, यंदा सोयाबीनला प्रथमच ८ हजार रुपये क्विंटलच्या पल्याड भाव मिळाल्याने यंदा या पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी हे बियाणे कितपत पुरणार हे प्रेरणी सुरू झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply