Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. तर उडू शकतो युद्धाचा भडका; पहा नेमके काय चालू आहे जागतिक राजकारणात

दिल्ली : जगभरात सर्वच देश करोना नावाच्या विषाणूशी दोन हात करीत आहेत. त्याचवेळी चीन अनेक देशांच्या कुरापती काढीत आहे आणि मध्यपूर्वेत अरबस्तानातील वाळवंटी भागात धार्मिक व जमिनीच्या मुद्द्यावर सुरू झालेला संघर्ष  पेटला आहे. इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझा पट्टीच्या प्रदेशात छोटेखानी युद्धाला तोंड फुटल्याने जगभरातील राजकारण पेटले आहे. आता या दोघांच्या बाजूने इतरही देश मैदानात उतरण्याची भाषा करून लागल्याने मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेचा हिंसाचार सुरूच आहे. हे सगळे मोठ्या युद्धाच्या दिशेने जाण्याची परिस्थिती असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या मध्य-पूर्व विभागाने दिला आहे. येथील अधिकारी टोर वेनसलँड हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाला परिस्थितीची माहिती देत आहेत. येथे तणाव वाढण्याची जबाबदारी घेऊन दोन्ही बाजूच्या नेत्यांनी शांतता कायम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. त्याचवेळी इस्त्रायलच्या विरोधात पॅलेस्टाईनची बाजू घेऊन आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर धडा शिकवावा, असे आवाहन तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले आहे.

Advertisement

Arsen Ostrovsky on Twitter: “This is not Star Wars. This is real life. Video you’re seeing is barrage of rockets just fired at #TelAviv from #Gaza and the #IronDome intercepting them (at least most of them). This is real life! #IsraelUnderAttack https://t.co/78BbgCrbcU” / Twitter

Advertisement

एर्दोगन यांच्या विधानामुळे या वादाला आणखी मोठे स्वरूप मिळण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये गाझा येथे मरण पावले गेलेल्या पॅलेस्टाईनची संख्या 43 झाली आहे. यामध्ये 13 मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. सुमारे 300 लोक जखमी झाले आहेत. रशिया-तुर्कस्तान या दोन्ही देशांच्या नेत्यांनी जेरुसलेमच्या विवादित प्रदेशावरील तणावाबाबत चर्चा केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्राईलला धडा शिकवायला हवा’ असे त्यात तुर्कस्तानने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने त्वरित हस्तक्षेप करावा जेणेकरून इस्राईलला ‘स्पष्ट संदेश’ मिळेल अशी मागणी तुर्कस्तानने केली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply