Take a fresh look at your lifestyle.

पंपवाले म्हणतात, ‘पैल्ली शंभराची नोट हातामंधी द्या’; महाराष्ट्रात ‘तिथे’ पेट्रोल झालेय 99.99 रुपये / लीटर

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुका गाजवल्यावर ज्या वेगाने करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच वेगाने पेट्रोल-डीझेलचे भावही वाढवण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. भारतातील अनेक शहरात आता पेट्रोलचे भाव शंभरीपार गेले आहेत. त्या बाबतीत मग महाराष्ट्र तसाही मागास आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी एका लिटरला ‘पैल्ली शंभराची नोट हातामंधी घ्या’ असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आलेली आहे.

Advertisement

अर्थातच ते शहर आहे परभणी आणि नांदेड. सध्या या दोन्ही शहरात पेट्रोलचे भाव 99.99 रुपये प्रतिलीटर आहेत. सध्या चलनी व्यवहारातून 50 पैसेही गायब झाल्याचे चित्र आहे. सरकारी दरबारी भले इतके पैसे चालत असतील. मात्र, नागरिकांच्या व्यवहारात 50 पैशांना तशीही काहीच किंमत नाही. त्यामुळेच 99 रुपये लीटर यापेक्षा जास्त भाव असलेल्या शहरात ग्राहकांना पेट्रोलसाठी प्रतिलीटर 100 रुपये द्यावेच लागत आहेत.

Advertisement

पेट्रोलचे भाव 99 रुपये लीटर यापेक्षा जास्त असलेली ठिकाणे अशी :

Advertisement
शहराचे नाव भाव
अमरावती 99.53
भंडारा 99.20
बीड 99.43
गोंदिया 99.33
हिंगोली 99.66
जळगाव 99.01
जालना 99.48
लातूर 99.84
नांदेड 99.99
नंदुरबार 99.54
उस्मानाबाद 99.23
परभणी 99.99
रत्नागिरी 99.66
सिंधुदुर्ग 99.56
यवतमाळ 99.75

 

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply