Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खान यांनी दाखवले उसने अवसान; पहा भारताच्या मुद्द्यावर काय घेतली आहे भूमिका

दिल्ली : आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पुन्हा एकदा उसने अवसान आणून भारताला आव्हान दिले आहे. काश्मीर मुद्द्यावर राजकीय भूमिका स्पष्ट करताना खान यांनी भारताला इशारा दिला आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याशिवाय पाकिस्तान हा देश भारताशी चर्चा करणार नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांनी मंगळवारी म्हटले आहे. दि. 5 ऑगस्ट, 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाशी संबंधित असलेल्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी भारताने रद्द केल्या होत्या. त्यामुळे त्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण करण्यासाठी पाकिस्तान सरसावला आहे.

Advertisement

खान यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत भारत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे सरकार कोणत्याही किंमतीवर भारताशी चर्चा करणार नाही. थेट प्रक्षेपण सत्रादरम्यान सामान्य लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना त्यांनी हे उसने अवसान आणले आहे. परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, सध्या भारताशी कोणतीही चर्चा होत नाही. परंतु भारताने काश्मीरबाबतच्या धोरणांमध्ये बदल केल्यास आणि काश्मीरमधील लोकांना दिलासा मिळाल्यास त्यांच्याशी चर्चा होऊ शकते.

Advertisement

इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत खान म्हणाले की, “जम्मू-काश्मीर हा संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावर असल्याने हा भारताचा अंतर्गत मुद्दा असू शकत नाही आणि त्यावर सुरक्षा परिषदेचे अनेक प्रस्ताव आलेले आहेत.” जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि देश आपले प्रश्न सोडविण्यास सक्षम आहे, असे भारत सातत्याने स्पष्ट सांगितले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply