Take a fresh look at your lifestyle.

कापसाच्या गुणवत्ता वाढीसाठी खास पॅटर्न; पहा शेतकऱ्यांना कस मिळणार फायदा

नागपूर : महाराष्ट्रात सर्वदूर आता कपाशीचे पिक घेतले जाते. एक प्रमुख कापूस उत्पादक भाग बनत असलेल्या महाराष्ट्रीयन कपाशीची गुणवत्ता आणि दर्जा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच आव्हानावर मात करण्यासाठी आता कृषी विभाग सरसावला आहे. कापूस उत्पादक पट्ट्यात कापसाची गुणवत्ता वाढवण्यासाठी “एक गाव, एक वाण’ अभियान हाती घेण्याचे पत्र कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

Advertisement

त्या पत्रातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
 1. कापूस उत्पादक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान पाच गावांची निवड
 2. विदर्भ, मराठवाडा, खान्देश या पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी हे वेगवेगळ्या वाणाचे बियाणे वापरल्याने येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा उद्देश
 3. जिनिंग- प्रेसिंगला हवा असलेला उच्च गुणवत्तेचा कापूस मिळतनसल्याने घेतला महत्वाचा निर्णय
 4. आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा
 5. शेतकरी किमान दोन ते तीन वाणांची कपास लावत असे. त्यामुळे जिनर्सलाही लांब धाग्याचा व उच्च प्रतीचा कापूस मिळत नसे. यातूनच एक गाव, एक वाण अभियानाची कल्पना सुचली
 6. वाणाची निवड करताना हलक्या जमिनीत कमी कालावधीत तयार होणारे निवडावे किंवा सरळ वाण अतिघन पद्धतीने लावावे, तसेच मध्यम तसेच भारी जमिनीवर त्याप्रमाणे वाणाची निवड
 7. एकाच गावात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असल्यास प्रकारानुसार वर्गीकरण करावे व जमिनीच्या वर्गीकरणानुसार वाणाची निवड करण्याची सूचना
 8. दि. १६ ते ३१ मेदरम्यान शेतकऱ्यांना बियाण्यांची पाकिटे उपलब्ध करून दिली जाणार
 9. जुलै २०२१ अखेरीस लागवडीपासून दीड महिना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली जाईल
 10. विदर्भातील मलकापूर येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीने १५ वर्षांपूर्वी उच्च प्रतीच्या आणि लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन होण्यासाठी = अशा प्रकारचा प्रयोग राबवला होता

संपादन : महादेव गवळी

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply