Take a fresh look at your lifestyle.

‘ते’ 5-10 दिवस आहेत महत्वाचे; काळजी घ्या, वाचा ‘ही’ माहिती आणि शेअरही करा

पुणे : करोनातून बरे झाल्यावर आपण काहीतरी मोठा दिव्य पराक्रम केल्याची भावना अजिबात कोणीही ठेऊ नये. कारण, बरे झाल्यावर पुढील काही दिवस महत्वाचे असतात. तसेच आपल्याला इतरांची काळजी घायची असल्याने कोविड प्रोटोकॉल सगळ्यांनी पाळावा. करोनाच्या पोस्टकोविड लक्षणांमध्ये रुग्णाची तब्बेत आणखी गंभीर होऊ शकते. अनेक ठिकाणी बरे झालेल्या रुग्णांना यातूनच मृत्यूला सामोरे जावे लागलेले आहे. मात्र, करोना झाल्यावर पहिल्या 5-10 दिवसात जास्त काळजी घ्यावी लागते.

Advertisement

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमध्ये बरेच लोक संक्रमित आणि काहीजण मृत पावल्यानंतर लागू झालेल्या कडक निर्बंधांमुळे भरतत हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे रुग्ण एकतर 14 दिवसांत बरे होते किंवा त्याची प्रकृती गंभीर होते. परंतु 14 दिवसांच्या या कालावधीतील सर्वात महत्त्वाचा वेळ 5 ते 10 दिवसांदरम्यान आहे. त्यामध्ये सुरुवातीला बरे वाटल्यावर रुग्ण बेफिकीर बनतात. त्याचवेळी लक्षणे आणखी वाढून तब्बेत खराब होण्याची टक्केवारी जास्त आहे.  अशा परिस्थितीत 5 व्या दिवसापासून 10 व्या दिवसापर्यंत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Advertisement

कोरोनाचं फक्त नाव बदला, महामारी छूमंतर होईल.. पहा कोणी केलीय भविष्यवाणी..?

Advertisement

काळजी घ्या रे : महाराष्ट्रातही करोनाच्या जोडीला ब्लॅक फंगस; वाचा लक्षणे आणि घातक परिणाम

Advertisement

corona news : राज्यात ‘हा’ भाग ठरतोय करोना हॉटस्पॉट..!

Advertisement

कोरोना विषाणूमुळे संक्रमित सुमारे 80 टक्के रुग्ण घरी विलगीकरणात असताना बरे होत आहेत. परंतु, जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर आपल्याला बर्‍याच गोष्टी आणि लक्षणांची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, आपण केलेले थोडीसे दुर्लक्ष आपल्या कुटुंबास धोक्यात आणू शकते. त्याची अनेक उदाहरणे आपणही बातम्यात पाहिली असतील. कोरोना संसर्ग झाल्यावर वेगवेगळे लक्षणे जाणवू शकतात. या वेळी शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात एंटीबॉडी तयार होतात. कधीकधी त्यावेळी परिस्थिती बिघडू शकते. सामान्यत: लक्षणे सहाव्या किंवा सातव्या दिवशी स्पष्ट दिवसात.

Advertisement

मग कोरोनाविरूद्ध आपल्या शरीराच्या आत लढाई सुरू झालेली असते. याच कालावधीत काही लोकांची प्रकृती गंभीर होऊ शकते. म्हणूनच, कोरोना संक्रमित व्यक्तीसाठी 5 व्या दिवसानंतर दुसरा टप्पादेखील म्हटले जात आहे. कारण यादरम्यान लोकांची स्थिती गंभीर होऊ शकते. यावेळी दुर्लक्ष करणे म्हणजे इतर संकटांना आमंत्रण देणे आहे. कोरोनाने संक्रमित झालेल्या व्यक्तीस 5 व्या ते 10 व्या दिवसापर्यंत भिन्न लक्षणे दिसू शकतात. यावेळी काही लोकांना बरे होतअसल्याचे वाटत असतानाच गंभीर लक्षणे जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे याकाळात ऑक्सिजनची पातळी कमी होणे, ताप येणे, श्वास घेण्यास अडचण यासारखे लक्षणे दिसल्यास तातडीने उपचारासाठी तयार रहा. अंगावर अजिबात आजार काढू नका. झोप येण्यात अडचण किंवा जडपणा जाणवला तरीही लगोलग डॉक्टरांना संपर्क करा.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply