Take a fresh look at your lifestyle.

अनुदानावर मिळावा की बियाणे; उरले तीनच दिवस, नोंदणीसाठी आहे इतकी सोपी प्रक्रिया..!

अहमदनगर : मॉन्सूनच्या पावसाबरोबरच आता सर्वांना खरीपाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांनी या हंगामाच्या तयारीसाठी जमिनीची मशागत करून तयारी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे अनुदानित बियाणे दिले जाणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.

Advertisement

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणे ५० टक्के अनुदानावर मिळणार आहे. यासाठी दि. १५ मे २०२१ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालय कार्यालय येथून प्राप्त अर्जांची ऑनलाइन सोडत काढून लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे मुद्दे असे :

Advertisement
  1. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा
  2. पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा
  3. भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप, टॅब, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीचे संग्राम केंद्र यामधून अर्ज करावा
  4. वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा
  5. महाडीबीटी पोर्टलवर ‘वैयक्तिक शेतकरी योजना’ या शीर्षकांंतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply