Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : ‘हमास’नेही दिले इस्रायलला प्रत्युत्तर; 130 मिसाईलद्वारे तेल अवीववर हल्ला

दिल्ली : इस्रायलने गाझामधल्या द हनाडी टॉवर या 13 मजली इमारतीवर हवाई हल्ला केल्यानंतर आता हमास संघटनेने 130 मिसाईलद्वारे तेल अवीववर हल्ला केला आहे. कट्टरवाद्यांनी इस्रायलमधल्या जेरुसलेम आणि इतर भागांच्या दिशेने शेकडो रॉकेट्स डागल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 28 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेल्यानंतर पॅलेस्टाईन कट्टरवाद्यांनी याला प्रत्युत्तर देताना रोकेट्स वर रॉकेट सोडून इस्रायलला झटका देण्याचा प्रयत्न केला आहे. अवघे जग करोना विषाणूच्या संकटाशी दोन हात करीत असताना या भागात जोरदार हिंसाचार उफाळला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

BBC News Marathi on Twitter: “इस्रायलची राजधानी तेल अविववर ‘अशी’ डागली हमासने 130 क्षेपणास्त्रं. #Israel #Gaza #Palestine #IsraelPalestineconflict https://t.co/YUIwCPhTUk” / Twitter

Advertisement

जेरूसलेममध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतरच्या गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही बाजूंनी शांतता बाळगण्याचे आवाहन जगभरातून केले जात आहे. मात्र, त्याचवेळी काहीजण याला चीथावानीची जोड देत आहेत. परिणामी या मुद्द्यावर जगभरात तीन गट पडले आहेत. अशावेळी यात आतापर्यंत 31 जण मारले गेले आहेत.

Advertisement

हमास या कट्टरवादी गटाने गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जेरुसलेमच्या दिशेने रॉकेट्स सोडल्याचे  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. गाझा पट्टीवर हमासचा ताबा असून जेरुसलेममधल्या अल्-अक्सा मशीदीचे इस्रायली दहशतवादापासून संरक्षण करायचा प्रयत्न करत असल्याचा दावा ‘हमास’ने केला आहे. मुस्लिम आणि ज्यूंसाठी पवित्र अशा या मशिदीच्या इथे सोमवारी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये झटापटी झाल्याने या हिंसाचाराला तोंड फुटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply