Take a fresh look at your lifestyle.

चर्चेतील ‘आइवरमेक्टिन’बद्दल वाचा ‘ही’ महत्वाची माहिती; पहा नेमके काय आहे औषधाचे महत्व

पुणे : सध्या कोणीही उठसूट आमच्याकडे करोना विषाणूवर औषध असल्याचे दावे करीत आहेत. यामध्ये गोमुत्रापासून आयुर्वेदिक औषधे आणि व्यसनासाठीचे घटकही औषध म्हणून चर्चेत आहेत. अशावेळी आता आणखी एक औषध गोवा राज्य सरकारच्या कृपेने चर्चेत आलेले आहे. त्याचे नाव आहे आइवरमेक्टिन.

Advertisement

हे औषध कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिले जात आहे. अनेक राज्यांच्या कोविड किटमध्ये या औषधाचा उल्लेख आहे. गोव्यात राज्य सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना हे औषध घेण्यास सांगितले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या म्हणण्यानुसार सर्व आरोग्य केंद्रांवर आइवरमेक्टिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लक्षणे आहेत की नाही याची पर्वा न करता प्रत्येकाने हे औषध घ्यावे.

Advertisement

Madhu Pai, MD, PhD on Twitter: “Merck, the company that makes Ivermectin, released this statement that more people should read: “No meaningful evidence for clinical activity or clinical efficacy in patients with COVID-19 disease” https://t.co/FTIQURWga8″ / Twitter

Advertisement

गोवा सरकार असे म्हणत असताच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) यांनी हे औषध न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे औषध नेमके कितपत प्रभावी आहे आणि त्याचा वापर करावा किंवा नाही, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे. Ivermectin हे तोंडातून घेतले जाणारे औषध आहे. जे परजीवी संसर्गाच्या (पैरासिटिक इन्‍फेक्‍शंस) उपचारात हे वापरले जाते. या औषधाचा वैद्यकीय वापर 1981 मध्ये सुरू झाला. डब्ल्यूएचओच्या आवश्यक औषधांच्या यादीमध्ये याचा समावेश आहे. काही संशोधनात असे आढळले आहे की सार्स-कोव्ह -2 सह काही सिंगल-स्‍ट्रैंड RNA वायरसच्या विरूद्धही हे अँटीवायरल म्हणून प्रभावी ठरले आहे.

Advertisement

डब्ल्यूएचओने कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये आयव्हरमेक्टिन न वापरण्याची शिफारस केली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख वैज्ञानिक सौम्य स्वामीनाथन यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नवीन लक्षणांमध्ये औषध वापरताना, त्याच्या सुरक्षिततेची व परिणामकारकतेची काळजी घेणे महत्वाचे आहे. डब्ल्यूएचओ सल्ला देतो की क्लिनिकल चाचण्याशिवाय कोरोना रूग्णांना हे औषध देऊ नये.”

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply