Take a fresh look at your lifestyle.

हेल्थ इन्फो : उन्हाळ्यात खा ‘हे’ पदार्थ आणि मस्तपैकी डायटिंगही करा की

कडाक्याचा उन्हाळा सर्वांनाच त्रासदायक ठरतो. उन्हाळ्यात तापमानात सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण होतात. उन्हाळ्याच्या दिवसात भूक कमी लागते. मात्र पाण्याची मागणी वाढते. तहान जास्त लागते. त्यामुळे या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. कारण उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि अशा परिस्थितीत आपण योग्य प्रमाणात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यासाठी उन्हाळ्यात आपण काही फळे आणि भाज्या खाऊ शकतो.

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसात टरबूजास मागणी असते. उष्णतेच्या काळात टरबूज शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. ९२ टक्के पाणी असल्याने हे फळ सर्वात चांगल्या हायड्रेटिंग पदार्थांपैकी एक मानले जाते. इतकेच नाही तर यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन देखील भरपूर प्रमाणात आहेत, जे कर्करोग किंवा हिट स्ट्रोकमध्ये खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात फायदा होतो. टरबूज खाल्ल्यानंतर शक्यतो पाणी पिणे टाळा.

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसांत काकडी हे सर्वोत्तम फळ मानले जाते. ही एक अशी भाजी आहे जी डिहायड्रेशनची समस्या दूर करते. काकडी व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असते आणि त्यात ९५ टक्के पाणी देखील आढळते. त्यात अगदी कमी कॅलरीज असतात. काकडी शरीरासाठी एक उत्कृष्ट डिटॉक्सिफायर आहे. ही आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनविण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय देखील आहे. त्यामुळे काकडीचा समावेश आहारात समावेश करण्यास हरकत नाही.

Advertisement

टोमॅटो एक सदाहरित फळ आहे, जे प्रत्येक ऋतूत अगदी सहज उपलब्ध होते. साधारणत: टोमॅटोचा उपयोग लोक भाजी म्हणून करतात पण उन्हाळ्याच्या दिवसात ते कच्चे खाल्ल्याने जीवनसत्त्वे-ए, बी -2, सी, फॉलेट, क्रोमियम, फायबर, पोटॅशियम आणि फायटोकेमिकल्स सारखी बरीच पोषक तत्वे एकत्र मिळतात. टोमॅटो मध्ये ९५ टक्के पाणी असते.

Advertisement

उन्हाळ्यात आपल्याला सर्वत्र जागी संत्री दिसून येतील. हे फळ थंड असते. हे फळ थोडेसे आंबट जरुर असते पण उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी त्यात आढळणारे पोटॅशियम चांगला स्त्रोत मानले जाते. कारण उन्हाळ्यात घाम आल्यानंतर शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते ज्यामुळे स्नायूंमध्ये आखडलेपणा जाणवतो. ८८ टक्के पाणी असलेले हे फळ व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शियम आणि फायबरने देखील समृद्ध आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply