Take a fresh look at your lifestyle.

कुठे सोन्याच्या मागे पळता, चांदीत करा गुंतवणूक, मालामाल व्हाल..! बघा कसा होतोय नफा..?

नवी दिल्ली : कोरोनाचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावरही झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Prices) चढ-उतार दिसत आहेत. आतापर्यंतचा विचार केल्यास 2021मध्ये सोन्याच्या तुलनेत (Gold Rates) चांदीतून गुंतवणुकदारांना अधिक नफा मिळाल्याचे चित्र आहे.

Advertisement

यावर्षी सोन्याची ओपनिंग प्राइस 50,180 रुपये प्रति तोळा होती, त्या स्तरावर सध्याची किंमत 4.39 टक्के कमी आहे. याउलट चांदीची (Silver Price) यावर्षी ओपनिंग प्राइस 68,254 रुपये प्रति किलो होती, आता त्यात 5 टक्क्याने वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, किंमती आणि औद्योगिक धातूच्या स्वरुपात चांदीचा वापर केला जातो. त्यामुळे सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत अधिक तेजी दिसत आहे.

Advertisement

बांधकामांमध्ये तेजी आल्याने चांदीचे दर वाढत आहेत. शिवाय चांदीच्या मागणीच्या तुलनेत कमी होणारा पुरवठा (Demand and Supply) यामुळेही भाववाढ होत आहे. चांदी एक मौल्यवान धातू असून, तो एक औद्योगिक धातूदेखील आहे. अमेरिका (US), चीन (China) आणि युरोपियन देशामधील (European Union) अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असताना चांदीची मागणी वाढत आहे. शिवाय खाण पुरवठा कमी झाल्यामुळे चांदीचे दर वाढत आहेत.

Advertisement

सर्व बेस मेटल कॉम्प्लेक्समध्ये तेजी आणि चीन, अमेरिका आणि यूरोपिय देशांमध्ये औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठं अंतर निर्माण झालं आहे, असं आयआयएफएल सिक्‍योरिटीज (IIFL Securities)चे अनुज गुप्ता यांनी सांगितलं आहे.

Advertisement

सुगंधा सचदेव यांचं असं म्हणणं आहे, की मीडियम टर्ममध्ये चांदीचे दर 75,500-76,000 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचू शकतात. तर दीर्घ कालावधीसाठी किंवा 2021च्या अखेरपर्यंत दर 85,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे आता चांदीत गुंतवणूक करून नंतर त्याची विक्री केल्यास चांगला नफा होऊ शकतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply