Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘डॉमिनोज पिझ्झा’वर झालीय कारवाई; पहा कितीचा दंड ठोठावला दक्षता पथकाने

अहमदनगर : सध्या वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू झालेला आहे. दूष आणि औषध दुकाने वगळता सगळे बंद आहे. तरीही या लॉकडाऊन कालावधीत काही दुकाने आणि संस्था सुरू असल्याने अहमदनगर महापालिकेच्या दक्षता पथकांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झा आणि चंदुकाका सराफ या दोन महत्वाच्या दुकानांसह अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे.

Advertisement

दि. 11 मे 2021 या दिवशी कोरोना दक्षता पथक क्रमांक 1 आणि 2 यांनी अनेक ठिकाणी कारवाई केली. या पथकाने गंज बाजार, माळीवाडा, ख्रिस्त गल्ली, ग्राहक भांडार आणि सावेडी भागात कारवाई केली. पथकप्रमुख शशिकांत नजान, सहायक सूर्यभान देवघडे, सहायक राहुल साबळे, राजेश आनंद, भास्कर आकुबत्तीन, विजय नवले, राजू गोरे, शैलेश दुबे, यु. आर. क्षीरसागर, पी. बी. आंबेकर, रमेश चौधरी, एस. डी. जाधव, एस. एस. गायकवाड, आर. एस. साळवे, पोलीस कर्मचारी संतोष राठोड आणि सोपान शिंदे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Advertisement

Advertisement

सावेडी येथे चंदुकाका सराफ आणि डॉमिनोज पिझ्झा या आस्थापना वर परवानगी नसतानाही आस्थापना उघडल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली. दोन्ही दुकानांवर प्रत्येकी 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सारडागल्ली (कापड बाजार) येथील वर्धमान दुकानावर 17 हजार, केडगाव परिसरात विविध दुकानांवर 8 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे व दक्षता पथक प्रमुख  शशिकांत नजान यांनी दिली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply