Take a fresh look at your lifestyle.

सर्वाधिक लसीकरण झालेल्या सेशेल्सचीही वाढली डोकेदुखी; ‘त्यांना’ही करोना झाल्याने WHO चिंतेत

दिल्ली : जगभरात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारीने सर्वाधिक लसीकरण करण्यात आफ्रिकन देश सेसेल्सने बाजी मारली आहे. यानिमित्ताने या देशाचे जगभरातून कौतुक चालू असतानाच आता त्या देशाची डोकेदुखी वाढवणारी बातमी आलेली आहे. होय, या देशातही आता लसीकरण केलेल्यांना मोठ्या प्रमाणात करोना विषाणूची बाधा होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनाही चिंतेत आहे.

Advertisement

भारतीय स्ट्रेनचा धोका लक्षात घेऊन जगभरातून भारताला मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. कारण, असा स्ट्रेन फोफावला तर अवघ्या जगामध्ये आणखी भयंकर आरोग्य संकट येऊ शकते. भारत लसीकरण आणि औषधाच्या बाबतीत चाचपडत असल्याने जगभरात चिंता व्यक्त होत आहे. अशावेळी सर्वाधिक लसीकरण झालेल्या सेसेल्समध्ये रुग्णसंख्या आठवड्यात दुप्पट झाली आहे. या देशात भारतात उत्पादित झालेली कोविशील्ड आणि चीनमधील उत्पादित साइनोफार्म या दोन्ही लसचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

Advertisement

तथापि, या वाईट बातमीमध्ये चांगली गोष्ट अशी आहे की, कोरोनाची लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे तिथे अजूनही मृत्यू झाला नाही. सेशेल्सचे आरोग्य मंत्रालय आणि डब्ल्यूएचओ या दोघांनीही लस घेण्याचा आग्रह धरला आहे. भारताने सेशेल्सला 50 हजार कोव्हिसिल्ड कोरोना लस भेट म्हणून दिल्या होत्या. डब्ल्यूएचओच्या रोगप्रतिकारक विभागाचे संचालक केट ओ ब्रायन यांनी सोमवारी सांगितले की, WHO चे अधिकारी सेशेल्स सरकारशी थेट संपर्कात आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply