Take a fresh look at your lifestyle.

आता चिमुकल्यांसाठी येतेय लस, बघा कोणती लस दिली जाणार..?

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकीकडे 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झालेले असताना, या चिमुरड्यासाठी लसच तयार झालेली नव्हती. मात्र, आता ही चिंता मिटली आहे.

Advertisement

भारत बायोटेक (Bharat Biotech) या लहान मुलांसाठी लस बनवत आहे. त्यात 2 ते 18 वयोगटातील बालके आणि मुलांच्या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्य़ा टप्प्यातील चाचण्यांसाठी एक्सपर्ट समितीने मंगळवारी (ता.11) शिफारस केली आहे.

Advertisement

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ)च्या कोरोनावरील तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकने दिलेल्या अर्जावर चर्चा केली. त्यानुसार आता दिल्ली व पाटणाच्या ‘एम्स’मध्ये आणि नागपुरच्या ‘मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट’सह विविध ठिकाणी या लसीची चाचणी केली जाणार आहे.

Advertisement

‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, ‘भारत बायोटेक’ची कोव्हॅक्सिन लस (18 वर्षांवरील नागरिकांना दिली जाणारी) बदलणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधात अँटबॉडी बनविण्यास प्रभावी आहे. ‘आयसीएमआर’ आणि ‘भारत बायोटेक’ने ही लस विकसित केली आहे. सामान्य कोरोना रुग्णांवर ही लस 78 टक्के प्रभावी ठरली आहे.

Advertisement

अमेरिकेत गुरुवारपासून मुलांना लसीकरण
अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीला मान्यता दिली आहे. ‘फायझर-बायोएनटेक’ने (Pfizer-BioNTech COVID Vaccine) ही लस बनविली आहे. अमेरिकेत गुरुवारपासून मुलांचे लसीकरण सुरु होऊ शकते. त्याचे कोणतेही ‘साइड इफेक्ट’ समोर आलेले नाहीत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply