Take a fresh look at your lifestyle.

बांगलादेशनेही दिला चीनला झटका; पहा कसा तिळपापड झालाय या मुजोर शेजारी देशाचा

दिल्ली : भारताची आर्थिक आणि राजकीय कोंडी करण्यासाठी सतत कुरापती काढायला तयार असलेल्या चीनच्या मुजोरीला बांगलादेश या देशाने मोठा झटका दिला आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीनच्या परराष्ट्र विभागाने यावर आगपाखड सुरू केली आहे. एकूणच यामुळे पुन्हा एकदा चीनच्या मनसुब्यांवर जगभरातून पाणी टाकण्याचे काम जोरात सुरू असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

Advertisement

करोना विषाणूचे संक्रमण होण्यात चीनचा आणि तेथील हुकुमशाहीचा मोठा वाटा आहे. जगभरातून हा देश यामुळे एकटा पडण्यास सुरुवात झालेली आहे. बीजिंग विरोधी क्लबचा भाग झाल्यास द्विपक्षीय संबंधांना ‘मोठा तोटा’ होईल, असे सांगून चीनने बांगलादेशला अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या आघाडीत सामील न होण्याचा इशारा दिला आहे. बांगलादेशातील चिनी राजदूत ली जिमिंग यांनी केलेला हा अनपेक्षित इशारा चिनी संरक्षणमंत्री जनरल वेई फेंग यांच्या भेटीनंतर आला आहे. त्यामुळे एकूणच बांगलादेशने दिलेला झटका चीनच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

The Quadrilateral Security Dialogue अर्थात QUAD Group हा अमेरिकेसह भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार प्रमुख देशांच्या नेतृत्वाखालील महत्वाचा ग्रुप आहे. त्यामध्ये बांगलादेश सहभागी झाल्याने चीनच्या रागाचा पारा वाढला आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमीन म्हणाले की, बांगलादेश हा  संतुलित परराष्ट्र धोरणावर विश्वास ठेवतो. आम्ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. आम्ही आमचे परराष्ट्र धोरण स्वतःच ठरवतो. तथापि, कोणताही देश आपली भूमिका व्यक्त करू शकतो. ते (चिनी राजदूत) देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना जे म्हणायचे आहे त्याबाबत ते सांगू शकतात. बांगलादेशने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे दि. 27 एप्रिल 2021 रोजी चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंग यांनी बांगलादेशला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अध्यक्ष अब्दुल हमीद यांना सांगितले होते की, बीजिंग आणि ढाका यांनी ‘लष्करी युती’ आघाडी बनवावी. तसेच दक्षिण आशियामध्ये ‘वर्चस्ववाद’ प्रस्थापित करण्यात गुंतलेल्या बाह्य शक्तींना थांबवावे. सोमवारी बांगलादेशातील डिप्लोमॅटिक संवाददाता संघटनेने आयोजित केलेल्या डिजिटल बैठकीत चिनी राजदूत ली जिमिंग म्हणाले की, “या चार फोर-नॅशनल क्लबमध्ये सामील होणे बांगलादेशला नक्कीच उपयोगी होणार नाही. उलट यामुळे यामुळे द्विपक्षीय संबंधांना मोठे नुकसान होईल.”

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply