Take a fresh look at your lifestyle.

अशी बी असतीय भाऊबंदकी..! चीनला पाहिजे ‘माउंट एव्हरेस्ट’च्या वाटण्या..!

नवी दिल्ली : साऱ्या जगाला कोरोनाच्या खाईत ढकलून चीन आता सुखनैव जगत आहे. जगभरातुन पुन्हा चीनमध्ये कोरोना (corona) पसरू नये, म्हणून काळजी घेत आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी चीननं आता ‘माउंट एव्हरेस्ट’ शिखराचीही वाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गिर्यारोहकांसाठी चीन चक्क या शिखरावर सीमारेषा आखणार आहे.

Advertisement

हिमालयातलं बर्फाच्छादित, पृथ्वीवरचं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट (Mount Everest). तिथं एका वेळी फक्त सहा जणांनाच उभं राहता येते. गिर्यारोहणाच्या ऐन हंगामात या शिखरावर चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना अक्षरशः रांगा लागतात. पण जगातलं हे सर्वोच्च ठिकाणही आता कोरोनापासून वाचलेले नाही. एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे.

Advertisement

एव्हरेस्ट शिखर दोन बाजूंनी सर करता येतं. एक म्हणजे नेपाळकडून आणि दुसरं चीनच्या बाजूने. नेपाळच्या बाजूने येणाऱ्या गिर्यारोहकांशी संपर्क येऊ नये, यासाठी चीनने या शिखरावर ‘सेपरेशन लाइन’ (separation line) आखायचं ठरवलं आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी नेमकी कशी करणार, याबाबत काही सांगितलेले नाही.

Advertisement

एव्हरेस्टची वाटणी करण्यासाठी चीननं ‘तिबेटी गाइड्स’ शिखरावर पाठवले आहेत. चिनी गिर्यारोहकांच्या चढाईपूर्वी ते ‘सेपरेशन लाइन’चं काम पूर्ण करतील. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून चढाई केलेल्या गिर्यारोहकांचा परस्परांशी संपर्क केवळ शिखरावरच येऊ शकतो. हे टाळण्यासाठी चीन सीमारेषा आखून त्यांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही, अशी सोय करणार आहे. शिखरावरील कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्याची परवानगीही त्यांना असणार नाही.

Advertisement

सध्या चीनच्या बेस कॅम्प (Base camp) वरून परवाना नसलेल्या पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परदेशी नागरिकांनाही चीननं यंदा ‘एव्हरेस्ट’वर चढाई करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र, नेपाळने आतापर्यंत 400 जणांना शिखरावर जाण्यास परवानगी दिली आहे. नेपाळची अर्थव्यवस्था प्रामुख्याने एव्हरेस्ट मोहिमांवर अवलंबून आहे.

Advertisement

नेपाळच्या बाजूने शिखरावर जाणाऱ्या 30 हून अधिक गिर्यारोहकांना कोरोना झाल्याचं वृत्त आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत 3,94,667 जणांना कोरोना संसर्ग झाला असून, 3720 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply