Take a fresh look at your lifestyle.

स्वस्तात घ्या घर, दुकान..! या बँकेनं दिलीय संधी.. त्वरा करा!

नवी दिल्ली : स्वतःचे घर बांधण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काहींना स्वतःचा उद्योग-धंदा सुरु करायचा असतो. मात्र, अडचण येऊन थांबते, ती पैशापाशी.. तुमचेही असेच काही स्वप्न असेल, तर काळजी करू नका.. लवकरच ते साकार होऊ शकते. ही काही भविष्यवाणी नाहीये, तर एक बँक तुमच्या मदतीला येतेय. तिच्या माध्यमातून तुमचे घराचे वा दुकानाचे स्वप्न साकार होऊ शकते.

Advertisement

देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) सर्वसामान्य लोकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध करून दिलीय. आजपासून (ता.12) पंजाब नॅशनल बँक रेसिडेंशियल आणि कॉर्पोरेट मालमत्तांचा लिलाव करणार आहे. त्यात तुम्ही स्वस्तात मालमत्ता खरेदी करू शकता.

Advertisement

‘पीएनबी’तर्फे ट्विट करून ही माहिती देण्यात आलीय. त्यात PNB e-Auction 12 मे 2021 रोजी होईल, असे म्हटले आहे. त्यात भाग घेण्यासाठी लोकांना ई-विक्री पोर्टल (e-Bikray Portal) https://ibapi.in वर भेट द्यावी लागेल. येथे लॉगिन करून स्वत:ची नोंदणी करा. कोरोनामुळे लिलावप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे.

Advertisement

पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, 10902 निवासी मालमत्ता, 2469 व्यावसायिक मालमत्ता, 1241 औद्योगिक मालमत्ता, 70 कृषी मालमत्ता लिलावासाठी उपलब्ध असतील. इच्छुक खरेदीदार त्यांच्या शहरानुसार निवडू शकतात. तपशीलवार माहितीसाठी https://ibapi.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा.

Advertisement

डिफॉल्टर मालमत्तेचा लिलाव
बँकांनी लिलावात काढलेली ही मालमत्ता आहे. संबंधीत मालमत्तेच्या मालकाने कोणत्याही कारणास्तव कर्जाची परतफेड केली नसल्यास बँक ती मालमत्ता जप्त करून त्यांच्या नुकसानाची भरपाई करून घेते. यामुळे आपल्याला लिलावात स्वस्तपणे ही मालमत्ता खरेदीची संधी मिळू शकते.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply