Take a fresh look at your lifestyle.

भारतासाठी ‘ती’ आहे चिंतेची बाब; पहा नेमके असे का म्हटलेय डॅनिश कनेरियाने..?

मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यावर्षी जूनमध्ये टीम इंडिया इंग्लंडला जाणार असून यासाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर डॅनिश कनेरिया याला वाटते की न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी लेगस्पिनरची निवड न केल्याने भारताने चूक केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राहुल चहर हा चांगला पर्याय ठरला असता.

Advertisement

कनेरियाने कराची येथील पीटीआयला सांगितले की, ”भारताने एक मजबूत संघ निवडला आहे, एकूणच त्यांची टीम चांगली आहे परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी लेगस्पिनरची निवड केली नाही. रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाच्या रूपात त्यांच्याकडे फिंगर स्पिनर्स आहेत पण त्यांच्याकडे लेग स्पिनर नाही.

Advertisement

इंग्लिश काउंटी एसेक्सकडून खेळणारा कनेरिया म्हणाला की, लेगस्पिनरसाठी इंग्लंडची परिस्थिती अनुकूल आहे. तो म्हणाला, ‘जेव्हा मी इंग्लंडमध्ये खेळतो तेव्हा तिथे ओलावा खूप असतो. तिथे खेळण्याचा मला खूप अनुभव आहे. मी वेगवेगळ्या परिस्थितीत ८ वर्षे काउंटी क्रिकेट खेळले आहे. ज्या ठिकाणी सीमरसाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे लेग स्पिनरही उपयुक्त आहे आणि म्हणून जेव्हा मी काउन्टी क्रिकेट खेळायचो तेव्हा तिथे यशस्वी झालो. त्यामुळे भारतीय संघात कोणताही लेगस्पिनर नाही ही चिंतेची बाब आहे.
संपादन : अपेक्षा दाणी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply