Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर ग्रामीणमध्ये लसीकरण कॅम्प उत्साहात; गर्दी टाळून दिली जातेय लस

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने सध्या ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नाहीत. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण चालू असताना मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. ही गर्दीच करोनाच्या संक्रमणासाठी जबाबदार ठरू शकते. हीच गंभीर शक्यता लक्षात घेऊन नगर तालुक्यात गाव तिथे लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत.

Advertisement

नुकतीच नारायण डोह (ता. अहमदनगर) येथे लसीकरण कॅम्प घेण्यात आला. तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गटात नारायनडोह येथे कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. यात दुसरा डोस घेणाऱ्याना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर मग साठ वर्षापुढील जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली.  यावेळी ग्रामस्थ व शिवसेना शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने कॅम्प पार पडला. यावेळी सोशल डिस्टन्स व इतर शासनाच्या सर्व नियमाचे पालनही अगदीच व्यवस्थित पार पाडले. गाव तेथे लसीकरण योजनेचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले असल्याची माहिती या योजनेची कल्पना मांडणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.

Advertisement

उद्योजक विशाल ससे, आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे मॅडम, पर्यवेक्षक वाकचौरे आदि यावेळी उपस्थित होते. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच किशोर गायकवाड, उपसरपंच पोपटराव बनकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश साठे, ज्ञानेश्वर साठे, आनंदराव साठे, पोपटराव साठे, रेवणनाथ शिंदे, आबा गवळी, बंडू मुंढे, प्रकाश म्हस्के, ग्रामसेवक भोंडवे (भाऊसाहेब), तलाठी वाबळे मॅडम, आशा सुपरवायझर साठे मॅडम, आरोग्यसेवक लिपणे,  आरोग्यसेविका बिडवे, MPW रायपिल्ले, आशा सेविका कांबळे, उकिरडे, अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply