Take a fresh look at your lifestyle.

निधीची पळवापळवी; पालकमंत्र्यांची ‘त्या’ सहाच आमदारांवर कृपा, विखे-थोरातांवरही अवकृपा

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर आमदारांनी डोळा ठेवण्याची नगर जिल्ह्यातील परंपरा महाविकास आघाडीच्या काळातही जोमात आहे. इतकेच नाही, तर या निधीच्या पळवापळवी मध्ये एकूण 12 पैकी फ़क़्त सहाच आमदारांच्या सहा तालुक्यांनी ‘बाजी मारली’ आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत तीव्र नापसंती दर्शवली आहे.

Advertisement

जिल्हा परिषदेच्या रस्ते दुरूस्तीच्या लेखाशिर्षकातून जिल्ह्यातील पाच आमदारांनी 17 रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटींचा निधी परस्पर हस्तगत केला आहे. ग्रामविकास विभागाच्या अध्यादेशाने हा निधी जिल्हा परिषद सोडून थेट आमदारांना देण्यात आलेला आहे. सध्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ज्या सहा आमदारांवर ग्रामविकास विभागाची कृपा झाली ती पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने झाल्याची चर्चा होत आहे.

Advertisement

सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा निधी आमदार-खासदार यांच्याकडे वळवण्याचा प्रकार सुरू झाला. आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने मग हीच परंपरा पुढे नेण्याचे ठरवल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. आमदारांना रस्ते दुरूस्तीसाठी स्वतंत्र 5054 लेखाशीर्ष आहे. तर जिल्हा परिषदेसाठी 3054 हे लेखाशिर्ष आहे. त्यावरच आता आमदारांनी डोळा ठेवला आहे. जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी यातून निधी मिळतो. तोच आमदारांनी हस्तगत केला आहे.

Advertisement

नगर जिल्ह्यातील दोन्ही बडे राजकीय प्रस्थ असलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही या पाच कोटींच्या निधीमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यांच्यासह आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, निलेश लंके, मोनिकाताई राजळे यांनाही यामध्ये निधी मिळालेला नाही. त्यांना ग्रामविकास विभागाने डावलले की, दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यावर कृपादृष्टी होणार हे पुढचा निधी मंजूर झाल्यावरच स्पष्ट होईणार आहे.

Advertisement
निधी मिळालेले आमदार मंजूर निधी (रुपये) रस्ते संख्या
मंत्री शंकरराव गडाख (नेवासा) 1 कोटी 4
लहू कानडे (श्रीरामपूर) 20 लाख 1
मंत्री प्राजक्त तनपुरे (राहुरी) 80 लाख 2
आशुतोष काळे (कोपरगाव) 1 कोटी 8
किरण लहामटे (अकोले) 1 कोटी 1
संग्राम जगताप 1 कोटी 1

 

Advertisement

स्त्यांची विशेष दुरूस्ती सुधारणा, खडीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण, अपघात प्रवर्ण भागाची सुधारणा, कमकुवत मोठ्या पुलाची दुरूस्तीसह अन्य कामे करण्यासाठी हा निधी दिला जातो. जिल्हा परिषदेच्या या निधीवर आमदारांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply