Take a fresh look at your lifestyle.

वॉर्नर-विल्यमसनने ‘या’ खेळातही आजमावले आपले नशीब; पहा व्हिडिओ

मुंबई : आयपीएल २०२१ च्या बायो बबलमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रवेशानंतर बीसीसीआयने स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. या लीगशी संबंधित प्रत्येक खेळाडू हा १४ वा हंगाम मिस करत आहेत.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीने ११ मे रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात संघातील अनेक दिग्गज क्रिकेट सोडून बास्केटबॉलमध्ये हात आजमावत आहेत. या व्हिडिओमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू जेसन होल्डर बास्केटबॉल कोर्टमध्ये आपले कौशल्य सादर करताना दिसत आहेत. तसं पहायला गेलं तर आयपीएल २०२१ चा हा हंगाम सनरायझर्स हैदराबादला एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी वाटत नसेल.

Advertisement

SunRisers Hyderabad on Twitter: “Hey, @NBA 👋 What say? 😉 #OrangeOrNothing #OrangeArmy https://t.co/qNQaoSZgzm” / Twitter

Advertisement

या संघाने ७ सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला असून पॉईट टेबलच्या ते एकदम तळाशी कायम आहेत. संघाच्या खराब कामगिरीनंतर डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून ते केन विल्यमसनच्या ताब्यात दिले होते. मात्र केनच्या नेतृत्वातही हैदराबादने सामना गमावला. यंदाची आयपीएल स्पर्धा ही कोरोना केसेसमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली असून सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये दुबईमध्ये स्पर्धेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply