Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भुवनेश्वर कुमारला टीम इंडियामधून वगळण्यात आले

मुंबई : पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नसून याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भुवनेश्वर कुमारची संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्याला का वगळण्यात आले असा सवाल उपस्थित केला जात होता. भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्याचे मुख्य कारण समोर आले असून बऱ्याच काळापासून टेस्ट फॉरमॅचमध्ये तो खेळत नसल्याने त्याला संघाबाहेर रहावे लागले आहे.

Advertisement

निवडकर्त्यांना असे वाटते की भुवनेश्वर कुमार अद्याप विशेषत: दिर्घ दौऱ्यासाठी खेळण्यास तंदुरुस्त नाही. अलीकडच्या काळात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.
जानेवारी २०१८ पासून भुवनेश्वरने प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. तो जानेवारी २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर भुवनेश्वरची मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निवड झाली, पण कसोटी सामन्यांसाठी तो तंदुरुस्त मानला जात नाही.

Advertisement

भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या शेवटच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. भुवनेश्वरने सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक आणि विजय हजारे ट्रॉफीद्वारे क्रिकेटमध्ये वापसी केली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. त्याने तीन एकदिवसीय सामन्यात सहा बळी घेतले. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेत भुवनेश्वरने चार विकेट्स घेतल्या.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply