Take a fresh look at your lifestyle.

म्हणून टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी होवू शकते श्रीलंकन टीममध्ये लसिथ मलिंगाची वापसी

मुंबई : टी २० फॉरमॅटमध्ये आपल्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा विश्वविख्यात गोलंदाज लसिथ मलिंगा यावर्षीच्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी असे म्हटले आहे की, मलिंगा विश्वचषक स्पर्धेसाठी बनविलेल्या योजनेचा एक भाग आहे आणि ते लवकरच त्याच्याशी बोलणार आहे. मलिंगा गेल्या काही काळापासून श्रीलंकेच्या संघातून बाहेर होता. तो यापूर्वी वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. २०१४ साली फायनलमध्ये भारताचा पराभव करून श्रीलंकेने टी-२० विश्वचषक जिंकला होता.

Advertisement

श्रीलंकेच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष प्रमोद विक्रमसिंघे म्हणाले की, आगामी टी-२० स्पर्धेच्या आणि यावर्षीच्या टी २० विश्वचषकाच्या योजनांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये श्रीलंकेच्या दिग्गजांशी बोलणार आहोत. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष प्रमोद विक्रमसिंघे यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, आम्ही लवकरच मलिंगाशी बोलू. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसह आगामी टी २० दौऱ्याच्या आमच्या योजनांमध्ये त्याचा समावेश आहे.

Advertisement

मलिंगाचे कौतुक करताना विक्रमसिंघे म्हणाले, मलिंगाचा सध्याचा फॉर्म पाहिल्यास तो अजूनही देशातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे हे आपण कधीही विसरू नये. त्याचे विक्रमाचे आकडे हे सिद्ध करतात. येत्या काही दिवसांत आम्ही मलिंगाला भेटणार असून तेव्हा आम्ही त्याच्याशी या संदर्भात बोलू. दरम्यान, लसिथ मलिंगाने सांगितले की, इन्स्टंट क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास तो अजूनही उत्सुक आहे. मी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण टी २० मधून नाही, असेही तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply