Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इंग्लंड दौऱ्यावर ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळायला हवे होते : राहुल द्रविड

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांचे संघात पुनरागमन झाले आहे तर इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळणाऱ्या हनुमा विहारीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, काही खेळाडूंची निवड न करण्यात आल्याने निवड समितीला प्रश्न विचारले जात आहे, यामध्ये कुलदीप यादवच्या नावाचा समावेश आहे. मागील अनेक दौऱ्यावर कुलदीप संघाचा सदस्य होता, परंतु अपेक्षेनुसार संधी त्याला मिळाली नाही. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी कुलदीपला संघात स्थान द्यायला हवे होते, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनेही व्यक्त केले आहे.

Advertisement

ईएसपीयन क्रिकइन्फोच्या वेबीनरमध्ये बोलताना द्रविड म्हणाला, ‘हे एक संतुलित स्कॉड दिसत आहे. हे २० सदस्यांचे पथक आहे. एक खेळाडू ज्याची निवड होऊ शकली तो कुलदीप यादव असू शकतो, परंतु अलिकडच्या काळात त्याच्या कामगिरीचा आलेख थोडा खाली आला आहे. तसेच, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर यांची अलीकडील कामगिरी पाहता, संघात कोणत्या प्रकारचे संतुलन आवश्यक आहे याबद्दल ते स्पष्ट झाले आहे.

Advertisement

अश्विन आणि जडेजा बॉलबरोबरच बॅटसह प्रभावी ठरू शकतात, तसंच अक्षर आणि वॉशिंग्टन त्यांची चांगली रिप्लेसमेंट ठरु शकतील. यामुळे फलंदाजीमध्ये सखोलता मिळेल आणि चारही फिरकी गोलंदाज त्यांना यात मदत करतील. पथकाची निवड केलेली पद्धत पाहून, मला वाटतं दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांना त्यांच्या सर्वोत्तम टीम इलेव्हनबद्दल माहित आहे, असंही द्रविड म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply