Take a fresh look at your lifestyle.

‘म्युकोरमायकॉसिस’बाबत मंत्री आव्हाडांनी केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

मुंबई : करोना विषाणूची बाधा होण्याच्या भीतीने अवघ्या जगभरात अनेकांची स्थिती वाईट असतानाच काळ्या बुरशीच्या आजाराच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. डोळे आणि प्रसंगी जीव धोक्यात आणणारा हा दुर्मिळ आजार सध्या त्यामुळे ट्रेंडमध्ये आलेला आहे. अनेकांना करोना झाल्यावर याची भीती वाटत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महत्वाचे आवाहन केले आहे.

Advertisement

ट्विटरवर त्यांनी म्हटले आहे की, कृपया आपण म्युकोरमायकॉसिस (काळी बुरशी) ह्या रोगाला होण्याआधीच घाबरलेल्या मानसिकतेने सामोरे जावू नका केवळ कोरोना रुग्णांना ते देखील उच्च रक्तदाब वा जास्त प्रमाणात प्रदीर्घ काळापासून असलेला मधुमेह असेल तरच हा रोग होण्याचा संभव आहे…इतरांना शक्यता फार कमी आहे.

Advertisement

Dr.Jitendra Awhad on Twitter: “कृपया आपण म्युकोरमायकॉसिस (काळी बुरशी) ह्या रोगाला होण्याआधीच घाबरलेल्या मानसिकतेने सामोरे जावू नका केवळ कोरोना रुग्णांना ते देखील उच्च रक्तदाब वा जास्त प्रमाणात प्रदीर्घ काळापासून असलेला मधुमेह असेल तरच हा रोग होण्याचा संभव आहे…इतरांना शक्यता फार कमी आहे #मास्क हिच सुरक्षा” / Twitter

Advertisement

मास्क हीच सुरक्षा असाही संदेश मंत्री आव्हाड यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य अभियानामध्ये म्युकोरमायकॉसिसवरील आजाराचा खर्च सारण्याची महत्वाची घोषणा केलेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply