Take a fresh look at your lifestyle.

नाशिक लॉकडाऊन : पहा कशी आहे सध्या या शहरामधील व बाजार समितीमध्ये परिस्थिती

नाशिक : वाढत्या करोना रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने नाशिक शहरात आज दुपारी १२ वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. तब्बल ११ दिवसांसाठी नाशिक शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आणि त्यासंदर्भातील कडक निर्बंध हाेणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे कालपासून या शहर आणि जिल्ह्याच्या गाविगावी बाजारपेठेत गर्दी झाली होती. आता ती ओसरू लागली आहे.

Advertisement

शहरातील अनेक भाग आता सुनसान होण्यास सुरुवात झाली आहे. चौकाचौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याने अनेकांची पळापळ झाली आहे. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, ओळखपत्र, बाहेर पडण्याचे कारण विचारात पोलिसांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी घरात राहण्याला प्राधान्य दिले आहे.

Advertisement

नियमावलीप्रमाणे सकाळी अकरा वाजेनंतर मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद करण्यात आली असून द्यापासून सकाळी ७ ते ११ यादरम्यान केवळ पार्सल किंवा होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाशिक शहरात सकाळी बाजार समितीत मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास संपूर्ण बाजारसमिती रिकामी झाली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply