Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडिया शोधतेय हार्दिक पांड्याला पर्याय; ‘हा’ खेळाडू घेतोय कठोर मेहनत

मुंबई : टीम इंडिया स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पर्यायी खेळाडू तयार करण्याचे काम करत आहे. भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी बुधवारी याचा खुलासा केला आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हार्दिक पांड्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही पांड्याला संघात स्थान मिळालेले नाही.

Advertisement

हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे शार्दुल ठाकूरकडे संघाला आवश्यक असलेला अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) मते, हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही.
हा पर्याय शोधण्याचा निर्णय निवडकर्ते घेतील, असे भरत अरुण यांनी सांगितले, परंतु शार्दुल ठाकूर याने  नक्कीच प्रबळ दावा केला आहे. अरुण म्हणाला, ‘अष्टपैलू शोधणे हे निवड समितीचे काम आहे आणि त्यानंतर आम्ही त्या अष्टपैलूला तयार करू शकू. शार्दुलने हे सिद्ध केले आहे की तो अष्टपैलू बनू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने उत्तम कामगिरी केली.

Advertisement

हार्दिक पांड्याने अखेरचा कसोटी सामना इंग्लंड दौऱ्यात २०१८ मध्ये खेळला होता. २०१९ पासून तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या दरम्यान त्याच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अरुणने कबूल केले की पांड्यासारखा चांगला पर्याय शोधणे खूप अवघड आहे.

Advertisement

दोन कसोटी सामने खेळणाऱ्या ठाकूरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यावर्षीच्या कसोटी सामन्यात आपला प्रभाव पाडत ब्रिस्बेनमध्ये अर्धशतक झळकावण्याव्यतिरिक्त या सामन्यात सात बळी घेतले. आगामी इंग्लंड दौऱ्यावर ठाकूरला बऱ्यापैकी संधी मिळाली पाहिजे. इंग्लंड दौऱ्यावर भारताला सहा कसोटी सामने खेळायचे आहेत, यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा समावेश आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply