Take a fresh look at your lifestyle.

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा आणि टीमही; खेळणार ३ एकदिवसीय आणि टी २० सामन्यांची मालिका

मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडिया जुलै महिन्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करेल, असे सांगितले आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी गेलेले विराट कोहली, रोहित शर्मासारखे खेळाडू या मालिकेत सहभागी होणार नाहीत. गांगुली म्हणाले की, श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंना त्यांची क्षमता दर्शविण्याची संधी दिली जाईल. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉ, जयदेव उनाडकट, राहुल चहर या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकेल असा विश्वास आहे.

Advertisement

एएनआयच्या वृत्तानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी २० सामने खेळले जातील. पहिला एकदिवसीय सामना १३ जुलै रोजी खेळला जाईल. पुढील दोन सामने १६ आणि १९ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २२ ते २७ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी २० मालिका खेळली जाईल.  ५ जुलै रोजी भारताची टीम श्रीलंकेला पोहोचेल आणि एक आठवडा क्वारंटाईनमध्ये थांबेल.

Advertisement

या खेळाडूंच्या नावावर होवू शकते शिक्कामोर्तब
इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघात निवड नसलेले शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या हे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसू शकतात. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया २ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतातून रवाना होईल आणि इंग्लंडला पोहोचल्यानंतर संघाला १० दिवस वेगळे रहावे लागणार आहे. यानंतर हा संघ इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Advertisement

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे – १३ जुलै
दुसरी वनडे – १६ जुलै
तिसरी वनडे – १९ जुलै

Advertisement

भारत विरुद्ध श्रीलंका टी -२० मालिका वेळापत्रक
पहिली टी २० – २२ जुलै
दुसरी टी २० – २४ जुलै
तिसरी टी २० – २७ जुलै
संपादन : अपेक्षा दाणी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply