Take a fresh look at your lifestyle.

‘सीरम’वर पैशांचा पाऊस, वर्षभरात मालामाल, पहा किती कोटींचा नफा झालाय..?

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया.. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ (covishild) लस बनवणारी भारतातील अग्रगण्य कंपनी. गेल्या वर्षभरात छप्परतोड कमाई करताना, सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीतही ‘सीरम’ अव्वलस्थानी आली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दोन लसींच्या आप्तकालीन वापरासाठी भारतात परवानगी देण्यात आली असून, त्यात ‘सीरम’च्या ‘कोव्हिशिल्ड’चा, तसेच ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा समावेश आहे. जगात सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच आहे. भारतात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८५ कोटी नागरिकांना लस देण्यासाठी १७० कोटी लसींची गरज भासणार आहे. त्यामुळे सरकारसह खासगी दवाखाने सर्वाधिक लस ‘सीरम’कडूनच घेत आहेत.

Advertisement

‘कॅपिटलाइन’ (capitline)च्या अहवालानुसार, भारतातील 418 कंपन्यांनी 2019-20मध्ये पाच हजार कोटींहून अधिक रकमेचा एकूण व्यापार केला आहे. त्यात ‘सीरम’ पहिल्या क्रमांकावर आली आहे. ‘लाइव्ह मिंट’च्या वृत्तानुसार 5446 कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात ‘सीरम’ने 2251 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या (सिटी बँक, मुथूट फायनान्स) या यादीत प्रामुख्याने तळाला आहेत. 5 हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये 18 कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्स (Macleods Pharmaceuticals) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीने २८ टक्के नफा कमावला आहे.

Advertisement

सीरम कंपनीने एप्रिल-2020 मध्ये पहिल्यांदा ‘ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका’ (oxford astrazeneca) सोबत एकत्र येत ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती केली होती. हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई क्षेत्र यातही ‘सीरम’ची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहाने गुंतवणूक केली आहे.

Advertisement

‘सीरम’चा महसूल 2008-09 आणि 2015-16 दरम्यान २३ टक्क्यांनी वाढून वार्षिक स्तरावर 4630 कोटींवर पोहचला. तर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत, तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी मुलाखतीमध्ये ‘सीरम’ला 3 हजार कोटींची गरज असून, त्यातून दर महिन्याला 10 कोटी लसींची निर्मिती करता येईल, असे सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply