Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल दरवाढीवर राष्ट्रवादीने मोदींना केले महत्वाचे आवाहन; पहा काय म्हटलेय चाकणकरांनी

पुणे : निवडणुका झाल्या की लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दररोज पेट्रोल व डीझेल यांच्या दरवाढीचा सपाटा लावला आहे. 5-10 पैशांत वाढ करून जनतेच्या अजिबात हे लक्षात येणार नाही असा खेळ केंद्र सरकार खेळत आहे. त्यालाच आक्षेप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मोदीजींना टोला लगावला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, ‘सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, एकदाचा काय तो फायनल आकडा सांगून टाका म्हणजे तशी आम्हाला आर्थिक आणि मानसिक तयार करायला बरी. हे रोज २०-३० पैशांनी किती दिवस दर वाढवणार आहात??’ अशा अप्द्धातीने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून दरवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

Rupali Chakankar on Twitter: “सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, एकदाचा काय तो फायनल आकडा सांगून टाका म्हणजे तशी आम्हाला आर्थिक आणि मानसिक तयार करायला बरी. हे रोज २०-३० पैशांनी किती दिवस दर वाढवणार आहात?? #PetrolDieselPriceHike” / Twitter

Advertisement

त्यावर सोनाली ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी स्वतः चाय विकले आहे म्हणतात. आम्हाला नाही वाटत. त्यांनी चहा विकला असता तर त्यांना गरीब जनतेची माहित असते. अर्धा देश तर विकून टाकला आता आणखीन काय बाकी आहे ते जनतेला सांगावे.’ तर, सई बेलकर यांनी म्हटलेय की, ‘पवार साहेबांना पत्र लिहायला लावा की उद्धव ठाकरेंना … थोडा टॅक्स कमी करा पेट्रोल वरचा… जस बार वाल्यांचा पुळका आला तसा सामान्य जनतेवर पण शिंपडा 2 3 थेंब प्रेमाचे.’

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply