Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरण : काँग्रेसने उपस्थित केले ‘ते’ महत्वाचे प्रश्न; पहा नेमका काय आहे विरोधाभास

मुंबई : राजकारणात कोणतीही कृती राजकारणविरहित असूच शकत नाही. किमान त्यात 1 टक्का का होईना राजकारण असतेच असते. त्याचाच प्रत्यय अनेकदा भारतीयांनी घेतला आहे. हे करणारे सर्वपक्षीय राजकारणी आणि सत्ताधारी आहेत. आताही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला?” / Twitter

Advertisement

सावंत यांनी म्हटले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर इडीने दाखल केलेला गुन्हा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे. परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI (सीबीआय) धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला?

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे. एकूणच सावंत यांच्या आरोपांना आता भाजप किंवा केंद्र सरकार कोणते प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply