Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस लॅपटॉप खरेदीपूर्वी वाचा ही महत्वाची माहिती; कारण, बजेटसह फिचर आणि ‘तेही’ आहेच की महत्वाचे

देशात करोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत घातक सिद्ध होत आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. आता तर दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी निर्बंध आधिक कठोर केले आहेत. खासगी क्षेत्रातील बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देत आहेत. अनेक जण तर या पद्धतीने कामही करत आहेत.

Advertisement

करोना संकटकाळात ऑनलाइन कामकाजास जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या लॅपटॉप साठी मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. लॅपटॉप खरेदी वाढली आहे. विविध कंपन्यांचे लॅपटॉप आज उपलब्ध आहेत. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फायद्याचे ठरेल.

Advertisement

Advertisement

जर लॅपटॉप खरेदी करणार असाल तर प्रथम तुमचे बजेट ठरवा. मार्केटमध्ये २० ते २५ हजारांच्या रेंजमध्ये चांगल्या फीचर्ससह लॅपटॉप उपलब्ध आहेत. इंटरनेटवर बजेट लॅपटॉपची लिस्ट पाहू शकता, जेणेकरून चांगला लॅपटॉप निवडणे शक्य होईल. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या किंमतीचे लॅपटॉप देत आहेत.

Advertisement

प्रोसेसर हा लॅपटॉपचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपण लॅपटॉप खरेदी करत असल्यास, लेटेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप निवडा. कोणत्याही लॅपटॉपचा स्पीड आणि परफॉर्मन्स त्याच्या प्रोसेसरवर अवलंबून असतो. जर आपल्या लॅपटॉपमध्ये अधिक रॅम असेल तर त्याचा परफॉर्मन्स अधिक चांगला होईल. अशा परिस्थितीत, लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी त्याचा प्रोसेसर आणि किती जीबी रॅम आहे ते पाहा. मार्केटमध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये ४ जीबी रॅमसह लॅपटॉप मिळेल.

Advertisement

Advertisement

लॅपटॉपमध्ये जितका जास्त स्टोरेज आहे तितका डेटा त्यात स्टोअर करता येतो. त्यामुळे अधिक स्टोरेज असलेला लॅपटॉप खरेदीस प्राधान्य द्या. लॅपटॉपसाठी चांगली बॅटरी देखील आवश्यक आहे. आजचे लॅपटॉप तीन ते चार तासांचा बॅटरी बॅकअप देत आहेत. लॅपटॉपची बॅटरी जितकी चांगली असेल तितकी जास्त वेळ आपण त्याचा वापर करू शकता.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply