Take a fresh look at your lifestyle.

खरीप नियोजन : पहा कृषी विभागाने नेमकी काय केलीय कार्यवाही; वाचा महत्वाचे मुद्दे

मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन, कापूस व मका  पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

स्थानिकस्तरावर लॉकडाऊन काळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे निर्देश भुसे यांनी यावेळी दिले. त्यांनी सांगितले की, ल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेवुन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम आयोजित कराव्यात. या बैठकीतील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा.
  2. बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषि आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल.
  3. सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखड्याप्रमाणे करीत असतांना राज्याकरिता विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा.
  4. महाबिज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्योत आलेली नाही. याबाबत खाजगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेवुन त्यांच्या कडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवावे.
  5. कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उदभवणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवड यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली यावर देखील सविस्तर संशोधन होऊन राज्यातील शेतकऱ्यांना शिफारसी द्याव्यात.
  6. पावसाळा वेळेवर आणि नियमीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करावे. बियाण्यांच्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे.
  7. कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी.
  8. कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे याकामी बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकारघ्यावा.
  9. परराज्यांतून बेकायदा बियाण्यांची विक्री राज्यात होऊ नये यासाठी कृषि विभागाने सतर्क राहावे.
  10. महाबीजने शासकीय प्रक्षेत्रे व कृषि विद्यापीठाकडील प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापुर्ण बियाणे शेतकऱ्यांसाठी उत्पादीत करावे.

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply