Take a fresh look at your lifestyle.

‘एसबीआय’ विमा कंपनीवर कारवाईचा बडगा; पहा काय घोळ घातलाय..?

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’वर विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, अर्थात ‘आयआरडीएआय’ने (IRDAI) 30 लाख रुपयांचा दंड केला आहे. 2018-19 मधील एका प्रकरणात विमा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआय जनरल इन्शुरन्सवर (SBI General Insurance) ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ हे विमा व्यवसायातील एक मोठं नाव आहे. मात्र, वाहन विम्यातील ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’मध्ये या कंपनीने अटींचं उल्लंघन केल्याचे समोर आलं. 2018-19मधील वाहन विमा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘आयआरडीएआय’नं ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे.

Advertisement

एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीनं 2018-19 मध्ये ‘एमटीपी’ नियमांचं पालन केलं नाही, असा ठपका ‘आयआरडीएआय’ने ठेवला आहे. त्यावेळी ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ कंपनीनं 321.98 कोटी रुपये, म्हणजे 50.44 टक्के कमी रकमेचा ‘एमटीपी’ केला. ही बाब समोर आल्यानंतर या कंपनीवर 30 लाखांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, याआधीच्या दोन वर्षांत या कंपनीने ‘एमटीपी’ नियमांचं पालन केलं नसल्याचा आरोप ‘आयआरडीएआय’ने केला आहे.

Advertisement

दरम्यान, जीवनविमा सोडून विमा क्षेत्रातील ज्या कंपन्या इतर विमा योजना देतात, त्यांच्या योजनांच्या प्रीमियमची रक्कम वाढली आहे. ‘आयआरडीएआय’च्या माहितीनुसार एप्रिल 2021 मध्ये एकूण 15 हजार 946.46 कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांकडे जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply