Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : तर सप्टेंबरमध्ये आयपीएल झाल्यास ‘हे’ खेळाडू खेळू शकणार नाहीत..!

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ चे यंदाचे सत्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आयपीएलचे ६० पैकी फक्त २९ सामने झाले आहेत. उर्वरित ३१ सामने टी -२० विश्वचषक होण्यापूर्वी सप्टेंबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या मध्यभागी आयोजित केले जाणार असल्याचे वृत्त आहे. जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असून आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू आयपीएल सामने खेळू शकणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

Advertisement

ईसीबी क्रिकेटचे संचालक अश्ले जाईल्स यांनी ही माहिती दिली. इंग्लंडचे टॉप क्रिकेटर यावेळी व्यस्त असतील. ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत, तर ॲशेस मालिका टी -२० विश्वचषकानंतर लगेच खेळली जाईल. ”आमचे एफटीपी वेळापत्रक खूप व्यस्त आहे,” जाईल्स यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला हे सांगितले. पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा आहे. आयपीएलच्या वेगवेगळ्या संघात इंग्लंडचे ११ क्रिकेटपटू सहभागी आहेत.

Advertisement

जाईल्स म्हणाले, ‘आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक काय असेल आणि ते कधी व कोठे असतील ते आम्हाला माहिती नाही. या हंगामात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. तो म्हणाला, आम्हाला टी २० वर्ल्ड कप आणि त्यानंतर ॲशेस मालिका खेळायची आहे. आम्हाला खेळाडूंच्या वर्कलोडची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply