Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. चीनने केलीच की आगळीक; पहा नेमके काय केलेय त्यांनी लडाख सीमावर्ती भागात

दिल्ली : चीन-भारत यांच्यातील वाद संपून संवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊन विरत नाहीत तोच पुन्हा एकदा चीनच्या सैन्याने लडाख भागात आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोना महासंकटात अडकून पडलेल्या भारताला पाहून चीनने पुन्हा एकदा युद्धाच्या तयारीला वेग दिला आहे. तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ चीनने आपले अत्यंत प्राणघातक आणि लांब पल्ल्याचे अत्याधुनिक पीएचएल -03 मल्टिपल रॉकेट लाँचर तैनात केले आहेत.

Advertisement

चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेल सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रक्षेपक भारतीय सीमेवर तैनात झिनजियांग कमांडला देण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचा असा दावा आहे की, हे अत्याधुनिक रॉकेट पूर्णपणे संगणकावर चालणारे आहेत आणि एकाच वेळी अनेक लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हे रॉकेट लाँचर लडाख सीमेवर 5200 मीटर उंचीवर तैनात करण्यात आले आहेत. हाच तो भाग आहे ज्यात गालवणमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये भयंकर चकमकी झाल्या होत्या.

Advertisement

सीसीटीव्हीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हे रॉकेट लाँचर तैनात करण्याचे काम वेगाने तैनात वेगाने चालू आहे. महत्त्वाचे क्षेत्र ताब्यात घेण्याची ही तयारी आहे. या रॉकेट प्रक्षेपकांच्या मदतीने चिनी सैनिक तिबेटचे पठार, बर्फाळ वाळवंट आणि सर्व प्रकारच्या हवामानात युद्धामध्ये लढू शकतील. या रॉकेट लाँचरमध्ये 12 इंच कॅलिबरच्या बॅरेलसह 12 नळ्या आहेत. प्रत्येक रॉकेटचे वजन सुमारे 800 किलो असते. या रॉकेटची अग्निशामक क्षमता 60 किमी प्रतितास वेगाने 130 किमी पर्यंत आहे.

Advertisement

Eva 郑 عائشة on Twitter: “India China Border Defense update – Stationed at Ngari Tibet, 2nd Artillery Brigade under PLA Xinjiang Military District received PHL-03 12-tube 300mm long-range multiple rocket launchers. It features a digital fire control system and a maximum firing range of 70-150 km. https://t.co/jnFibMlkmH” / Twitter

Advertisement

सीसीटीव्हीने दावा केला आहे की, ही रॉकेट यंत्रणा अवघ्या तीन मिनिटांत युद्धासाठी तयार होऊ शकते. हे रॉकेट लाँचर चीनमधील बाडू सिस्टमशी जोडले गेले आहे जेणेकरून ते अचूकपणे प्रहार करु शकतील. लडाखमध्ये भारतीय लष्कराला उत्तर देताना चीनने आपली अतिशय हलकी टाईप 15 टँक तैनात केली आहेत. एक 155-मिलीमीटर तोफ पीसीएल -181, उंच उंचावरील ड्रोन्स उडवण्यास सक्षम आहे. भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सापडला आहे. त्यावेळी मदतीची भाषा करणारा चीन दुसरीकडे युद्धाच्या तयारीत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply