Take a fresh look at your lifestyle.

महासागरात उठलेय चक्रीवादळ, ‘मॉन्सून’वर होणार ‘हा’ परिणाम..!

मुंबई : मे महिना उजाडताच शेतकऱ्यांसह सगळ्याच्या नजरा यंदा पाऊसपाणी कसं असणार, याची चर्चा करू लागतात. हवामान विभागाचा अंदाज कधी जाहीर होतो, याकडे लक्ष लागते. मॉन्सूनच्या (Monsoon) वाटचालीकडे लक्ष लागलेले असते.

Advertisement

हवामान विभागाने यंदाच्या हंगामातले पहिले ‘सायक्लोन बुलेटिन’ प्रसिद्ध केले. त्यानुसार, यंदा तब्बल 10 दिवस आधीच मान्सूनला गती देणाऱ्या हालचाली दिसत आहेत. कारण, हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी चक्रीवादळाची निर्मिती सुरू झाली आहे.

Advertisement

यंदा मान्सून लवकरच येणार असल्याची ही वर्दी आहे. दरवर्षी 20 मेच्या आसपास बंगालच्या उपसागरात असे दृश्य दिसते; मात्र यंदा 10 दिवस आधीच हिंद महासागरातील मालदीव बेटाजवळ, तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी ही चक्रीय स्थिती तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

हवामानशास्त्राच्या भाषेत त्यास ‘सायक्लोजेनेसिस’ (cyclogenesis) असे म्हणतात. ‘सायक्लोजेनेसिस’ म्हणजे चक्रीय परिस्थिती. सोमवारी (ता.10) दुपारी ही स्थिती या तिन्ही ठिकाणी निर्माण झाली होती. वार्‍याचा वेगही वाढला आहे.

Advertisement

सध्या वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, पुढील 120 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. पहिल्या टप्प्यात 14 मेपर्यंत चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात व 16 मे रोजी चक्रीवादळ तयार होऊन ते ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीवरदेखील हीच स्थिती असून, मान्सूनसाठी ती पूरक, गती देणारी आहे. त्यामुळे यंदा मान्सून 20 मेपर्यंत बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply