Take a fresh look at your lifestyle.

‘एचडीएफसी’चा अभिनव उपक्रम; ‘त्या’ तंत्रज्ञानाने आता प्रत्येक गावात मिळणार बँक सेवा..!

पुणे : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँक (HDFC Bank / एचडीएफसी बँक) यांनी ग्राहकांना विशेष भेट दिली असून देशातील प्रत्येक खेड्यात आणि गावात त्याचा विस्तार होण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँकेने ‘अवा’ चॅटबॉट सुरू (eva chatbot hdfc service) केला आहे. एचडीएफसी बँक आणि कॉमन सर्व्हिसेस सेंटर (सीएससी / common service centre) यांनी ही डिजिटल सेवा पोर्टलवर सुरू केली आहे. ही भागीदारी दीड लाख ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना (rural entrepreneurs)  आर्थिक सेवा देण्यास मदत करेल.

Advertisement

‘अवा’ च्या माध्यमातून ग्रामीण पातळीवरील उद्योजक एचडीएफसी बँकेची उत्पादने व सेवांविषयी माहिती व लाभ घेवू शकतील. ही सेवा २४ तास उपलब्ध असेल. या प्रोग्रामच्या माध्यमातून उद्योजक खाते उघडणे (account opening), कर्जाचा आराखडा (bank loans proposals) तयार करणे आणि उत्पादनांचे तपशील शिकून आपला व्यवसाय सुधारण्यास सक्षम असतील. सध्या १,२७, ३४८ गाव पातळीवरील उद्योजक एचडीएफसी बँकेशी संबंधित सेवा घेत आहेत, त्यापैकी १५,७९१ हे व्यवसायातील भागीदार आहेत जे भारतातील ६८५ जिल्ह्यांमधील बँकिंग आउटलेटद्वारे ग्राहकांना सेवा देतात.

Advertisement

Krushirang on Twitter: “एकदम भयंकर बातमी आहे ही… #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/xS4G34CVAW” / Twitter

Advertisement

अवा कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय प्रतिनिधी ग्रामीण नागरिकांना गृहकर्ज (home loan), कार कर्ज (car loan), दुचाकी कर्ज (two wheeler loan), ट्रॅक्टर कर्ज (tractor loan) इत्यादीसाठी मदत करतील. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला चालू खाते (current account), बचत खाते (saving account) किंवा संचयी आणि निश्चित ठेव खाते उघडायचे असल्यास त्यामध्येही मदत देण्यात येईल.

Advertisement

अधिकाधिक लोकांना बँकिंग सेवेशी (banking service) जोडण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या वतीने ही सेवा सुरू करण्याचे उद्दीष्ट आहे. एचडीएफसी बँक समूहाच्या, शासकीय आणि संस्थात्मक व्यवसाय (जीआयबी) आणि स्टार्टअप्स (Startups’) स्मिता भगत म्हणाल्या, ही मोहीम ग्रामीण आणि शहरी भारतातील दरी मिटवण्यास मदत करेल. ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रसार कमी आहे. अशा परिस्थितीत आम्ही ग्रामीण भागातील उद्योजकांना बँकिंग सेवांबद्दल शिकण्यास आणि इतरांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत करू. ‘
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply